Welcome Baby Girl! 'या' व्यक्तीने केली दीपिका आणि रणवीरच्या पोस्टवर पहिली कमेंट

 दीपिका आणि रणवीरच्या पोस्टवर  कमेंट करणारी पहिली व्यक्ती कोण आहे जाणून घेऊया.

| Sep 08, 2024, 23:33 PM IST

Deepika Padukone and Ranveer Singh  Baby :  दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग (Deepika Padukone and Ranveer Singh) आई-बाबा झाले आहेत. .गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी  दीपिकाने मुलीला जन्म दिला आहे. Welcome Baby Girl! अशी पोस्ट करत दीपिका आणि रणवीर यांनी आपल्या चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. त्यांच्या या सोशल मिडिया पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.   'या' व्यक्तीने  दीपिका आणि रणवीरच्या पोस्टवर पहिली कमेंट   केली आहे. 

1/7

Viral bhayani या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यात दीपिका आणि रणवीरच्या फोटोवर Its a girl असं लिहिण्यात आलं. यानंतर आता  दीपिका आणि रणवीर यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत अधिकृतपणे याची घोषणा केली आहे.    

2/7

दीपिका आणि रणवीर यांच्या पोस्टवर सर्व प्रथम आलिया भटने कमेंट केली आहे. आलियासह करीना कपूर, श्रद्धा कपूर यांच्यासह बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींसह लाखो चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

3/7

Welcome Baby Girl! अशी पोस्ट करत दीपिका आणि रणवीर यांनी आपल्या चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. त्यांच्या या फोटोवर लाखो कमेंट्स आल्या आहेत.

4/7

गेल्या आठवड्यातच दीपिकाने मॅटरनिटी फोटोशूट केले होते. मॅटरनिटीच्या बोल्ड फोटोशूटमुळे दीपीकाला ट्रोल देखील करण्यात आले.

5/7

फेब्रुवारी महिन्यात दीपिका आणि रणवीर यांनी  सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आई वडिल होणार असल्याची गुड न्यूज दिली होती.

6/7

2018 मध्ये दीपिका-रणवीर यांनी  इटली येथे डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. जवळचे मित्र-मैत्रिण व नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा हा शाही लग्न सोहळा पार पडला होता. त्यानंतर मुंबई आणि बेंगळुरुत त्यांनी रिसेप्शन पार्टी ठेवली होती.   

7/7

शुक्रवारी रणवीर आणि दीपिकाने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यानंतर दुसऱ्याच दिवशी दीपिका रुग्णालयात दाखल झाली.