शो बंद होताच कर्जात बुडाली 'ही' अभिनेत्री, आली रस्त्यावर राहण्याची वेळ

टीव्ही असो की बॉलिवूड अनेक कलाकारांना घरोघरी भटकावे लागते. अशीच परिस्थिती एका टीव्ही अभिनेत्रीसोबत घडली. तिच्याकडे सर्व काही असताना देखील ती कर्जात बुडाली. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर 

| Dec 20, 2024, 15:55 PM IST
1/7

टीव्ही अभिनेत्री

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईचे नाव टॉप अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. 'उत्तरन' मालिकेत तपस्याची भूमिका साकारून ती रातोरात लोकप्रिय झाली. 

2/7

मोठा खुलासा

परंतु, करोडो रुपयांची कमाई करून देखील अभिनेत्रीकडे पैसे शिल्ल्क राहिले नाही. ब्रुट इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल खुलासा केला आहे.   

3/7

कर्ज

रश्मी म्हणाली की, मी एक घर घेतले होते. त्यामुळे माझ्यावर अडीच कोटी रुपयांचे कर्ज होते. यासोबतच अजून एक 3.25 ते 3.5 कोटी रुपयांचे अजून एक कर्ज माझ्यावर होते. 

4/7

अचानक शो बंद

मला वाटलं सर्व काही ठीक आहे, पण अचानक माझा शो बंद झाला. त्यावेळी तिला चार दिवस रस्त्यावर झोपावे लागले.   

5/7

रिक्षावाल्यांसोबत जेवण

तिने स्वत: ला कुटुंबापासून पूर्णपणे वेगळे केले होते. तिला रिक्षावाल्यांसोबत जेवण करावे लागत होते. ती तिच्या गोष्टीमध्ये इतकी मग्न होती की ती सर्व काही विसरली होती.     

6/7

घटस्फोट

तिचा घटस्फोट झाला आणि मग तिच्या मित्रांना वाटले की रश्मी खूप संकटात आहे. कारण ती फार काही बोलत नव्हती. तिच्या घरच्यांना तिचे सर्व निर्णय चुकीचे वाटायचे.   

7/7

2011 मध्ये लग्न

रश्मी देसाईने अनेक शोमध्ये काम केलं आहे. 'उत्तरन', 'दिल से दिल तक' आणि 'बिग बॉस सीझन 13' मध्ये देखील रश्मी दिसली होती. 2011 मध्ये तिने नंदिश संधूशी लग्न केले होते.