IND vs BAN : टेस्ट सिरीजसाठी लवकर टीम इंडियाची घोषणा; विकेटकिपरच्या जागेवर 'या' खेळाडूने टाकला रुमाल

India vs Bangladesh squad announcement : येत्या 19 सप्टेंबरपासून टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी आता लवकरच टीम इंडिया जाहीर होणार आहे.

Saurabh Talekar | Sep 08, 2024, 21:36 PM IST
1/5

दुलीप ट्रॉफी

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंना थेट टीम इंडियाची कवाडं खुली होतील. त्यामुळे खेळाडूंमध्ये चुरशीची लढाई सुरू झाली आहे. 

2/5

विकेटकिपर

दुलीप ट्रॉफीमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या विकेटकिपर फलंदाजांमध्ये अभिषेक पोरेल, केएस भरत, ऋषभ पंत, ध्रुव जुरैल या खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे.

3/5

ऋषभ पंत

बांगलादेश टेस्टसाठी ऋषभ पंत आणि ध्रुव जुरैल या दोन विकेटकिपर फलंदाजांना स्कॉडमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. तर यापैकी एकजण प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल.

4/5

केएल राहुल

तर बीसीसीआयसमोर केएल राहुलचा पर्याय देखील खुला असणार आहे. केएल राहुलला संघात स्थान मिळू शकतं. केएलने इंडिया बी संघाविरुद्ध अनुक्रमे 37 आणि 57 धावांची खेळी केली होती. 

5/5

केएल राहुलला संधी?

केएल राहुलने दुलीप ट्रॉफीमध्ये विकेटकिपिंग केली नाही, त्यामुळे केएल राहुलला संधी मिळणार की नाही? असा सवाल विचारला जातोय.