Metabolism: तुमचे चयापचय वेगवान करतीय हे पाच पेये, वजन कमी करण्यास मिळेल मदत

Can Slow Metabolism Be Cured: बरेच लोक जेवणामध्ये खूप मोठा गॅप ठेवतात. मात्र असे करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे चयापचय गती मंद होऊ शकते. त्यामुळे तुमच्या जेवणात जास्त अंतर ठेऊ नका. तसेच कमी मेटाबॉलिज्म असलेल्या लोकांना पोटात, लिव्हर  आणि आसपाच्या अवयवांभोवती चरबी जमा  होण्याचा धोक असतो. अशावेळी आम्ही सांगत असलेले 5 चहा तुम्हाला मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करु शकतात.   

Jan 22, 2023, 10:51 AM IST
1/5

मोचा टी

मोचा हा जपानी चहा आहे. जो अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध असतो.व्यायामापूर्वी एक कप मोचा चहा घेतल्याने मेटाबॉलिज्म वाढवण्यासह वजन कमी होण्यास मदत होते.

2/5

ब्लॅक टी

ब्लॅक टी मध्ये फ्लेव्होन असतात, जे शरीरातील अतिरिक्त कॅलरी किंवा चरबी जाळण्याचे काम करतात आणि मेटाबॉलिज्म गतिमान करतात. याशिवाय ब्लॅक टी मध्ये असलेले कॅफीन देखील मेटाबॉलिज्म सुधारते, विशेषत: सकाळी सेवन केल्यावर याचा अधिक फायदा दिसून येतो. 

3/5

आल्याचा चहा

आल्याचा चहा सेवन केल्यामुळे रक्तदाबाबरोबरच सर्दी-खोकला, मळमळ, हृदयविकार, लठ्ठपणाही नियंत्रित ठेवता येतो. आल्याचा चहा हा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो आणि म्हणूनच जुन्या काळापासून आपल्याकडे आल्याचा चहा पिण्याची पद्धत आहे.

4/5

व्हाईट टी

व्हाईट टी मुळे मेटाबॉलिज्म क्षमता 4-5% ने वाढवू शकतो. तसेच चहाच्या फक्त एका सर्व्हिंगमुळे अतिरिक्त 70-95 कॅलरीज बर्न होतात. याशिवाय, मेटाबॉलिज्म-बूस्टिंग कंपाऊंड EGCG व्हाईट टी मध्ये आढळते, जे लठ्ठपणा रोखण्यासाठी देखील प्रभावी आहे. 

5/5

ग्रीन टी

नियमित ग्रीन टी पिणे मेटाबॉलिज्म वेगाने वाढवण्यास आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये कॅटेचिन आणि ईजीसीजी कंपाऊंड नावाचे अँटीऑक्सिडंट असते.