Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांवरील हनुमाजीच्या कृपाने संकटाचा काळ संपणार! तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 22 to 28 april 2024 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 22 ते 28 एप्रिल हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

Apr 21, 2024, 13:43 PM IST
1/10

Weekly Numerology 22 to 28 april 2024 in Marathi

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंक गणितानुसार अतिशय खास आहे. हनुमान जयंतीसह रवि योग, हर्ष योग, वज्र योग आणि सिद्धी योग आहे. या शुभ योगामुळे काहींसाठी संकटाचा काळ संपुष्टात येणार आहे. तर हनुमाजीची काही मूलांकावर विशेष कृपा बरसणार आहे. 1 ते 9 अंक असलेल्या सर्व लोकांसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक अंकशास्त्र डॉ. कविता ओझा यांच्याकडून   

2/10

मूलांक 1

प्रेम जीवनासाठी हा आठवडा लकी असणार आहे. तुमचं नातं पहिलेपेक्षा मजबूत आणि घट्ट होणार आहे. आनंद तुमचं दार ठोठावणार आहे. हळूहळू प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. आर्थिक बाबतीत दिलासा मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी मध्यम यशही तुम्हाला आनंद देऊन जाईल. 

3/10

मूलांक 2

हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक लाभाचा ठरणार आहे. आर्थिक बाबतीतही समतोल राखल्यास लाभ होईल. प्रेमजीवनात आनंद आणि रोमान्स असणार आहे. कामाच्या ठिकाणी जोखीम पत्करुन निर्णय घेतल्यास फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी कुठे तरी फिरायला जायचा बेत करु शकता. 

4/10

मूलांक 3

कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेली मेहनत तुम्हाला भविष्यात सुंदर परिणाम देणार आहेत. या आठवड्यात आर्थिक खर्च जास्त होणार आहे. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. तुम्ही कठोर परिश्रमाने प्रेम संबंधांमध्येही यश मिळवणार आहात.   

5/10

मूलांक 4

हा आठवडा प्रगती घेऊन आला आहे. कार्यक्षेत्रात लक्षकेंद्रित करणे तुमच्यासाठी यशाचे दार उघडणार आहे. प्रेमसंबंधात मात्र दुरावा येणार आहे. त्यामुळे तुमचं मन अस्वस्थ असणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. आठवड्याच्या शेवटी आनंदच आनंद असेल.     

6/10

मूलांक 5

हा आठवडा प्रेमसंबंधासाठी अडचणीचा ठरणार आहे. या आठवड्यात संयम ठेवणं हिताच होईल. कामाच्या ठिकाणीही प्रगतीत वेळ लागणार आहे. खरे आठवड्याच्या शेवटी सुख समृद्धी तुमचं दार ठोठवणार आहे.   

7/10

मूलांक 6

हा आठडा कामाच्या ठिकाणी प्रगतीचा असणार आहे. मात्र हा आठवडा खर्चिकही असणार आहे. एखाद्या विशेष गोष्टीसाठी अचानक पैसा खर्च होणार आहे. प्रेम जीवनात आनंद आणि सुख असणार आहे. आठवड्याच्या शेवटी एखाद्या स्त्रीमुळे त्रास वाढणार आहे. 

8/10

मूलांक 7

आर्थिक बाबींसाठी हा आठवडा चांगला असून तुमच्या संपत्ती वाढ होणार आहे. प्रेमसंबंधात आळस आणि अस्वस्था वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी नैतिकता जपा आणि निर्णय घ्या. आठवड्याच्या शेवटी मन उदास आणि चिंतेत असणार आहे. 

9/10

मूलांक 8

या आठवड्यात तुम्ही कोणताही निर्णय थोडा संयमाने घेणे तुमच्या हिताच ठरेल. अनावश्यक वादात अडकू नका. प्रेमसंबंधांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही चिंतेत असणार आहात. 

10/10

मूलांक 9

आर्थिक बाबींसाठी हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी यश आणि प्रगती तुमची वाट पाहत आहे. समाजातही मान सन्मान हळूहळू वाढणार आहे. प्रेमसंबंध मजबूत होणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)