वरुण तेजचे 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट तुम्ही पाहिलेत का? बॉक्स ऑफिसवर केली गडगंज कमाई

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सुद्धा बॉलिवूडप्रमाणे अनेक कलाकारांनी ब्लॉकबस्टर आणि हीट चित्रपट दिले आहेत. आपल्या दमदार अभिनयाने दक्षिणात्य अभिनेते आणि अभिनेत्री या बॉक्स ऑफिसवर मोठे यश संपादन करत आहेत. अशाच लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये वरुण तेज या दक्षिणात्य अभिनेत्याचं नाव घेतलं जातं. वरुणने दक्षिणात्य सिनेसृष्टीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. विकेंडसाठी उत्तम पर्याय ठरलेल्या वरुण तेजच्या अशाच 5 ब्लॉकबस्टर चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत.

Jan 19, 2025, 12:43 PM IST

Happy Birthday Varun Tej: दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सुद्धा बॉलिवूडप्रमाणे अनेक कलाकारांनी ब्लॉकबस्टर आणि हीट चित्रपट दिले आहेत. आपल्या दमदार अभिनयाने दक्षिणात्य अभिनेते आणि अभिनेत्री या बॉक्स ऑफिसवर मोठे यश संपादन करत आहेत. अशाच लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये वरुण तेज या दक्षिणात्य अभिनेत्याचं नाव घेतलं जातं. वरुणने दक्षिणात्य सिनेसृष्टीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. विकेंडसाठी उत्तम पर्याय ठरलेल्या वरुण तेजच्या अशाच 5 ब्लॉकबस्टर चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत.

 

1/7

वरुण तेज

Varun Tej Top Blockbuster movies: आज दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता वरुण तेज याचा आज 35 वा वाढदिवस आहे. वरुणचा जन्म हैदराबाद मध्ये झाला. वयाच्या 10 व्या वर्षी वरुणने त्याच्या वडिलांच्या 'हँड्स अप' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. या चित्रपटातूनच वरुणच्या अभिनय कार्यक्षेत्राला सुरुवात झाली.  

2/7

वरुण तेजचे ब्लॉकबस्टर चित्रपट

'हँड्स अप' या चित्रपटात भूमिका साकारल्यानंतर 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मुकुंदा' या चित्रपटात वरुण झळकला होता. आपल्या 11 वर्षांच्या करिअर मध्ये त्याने 15 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटापैकी बहुतांशी चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर हीट ठरले आहेत. या हीट चित्रपटांपैकी प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती असणाऱ्या अशाच 5 चित्रपटांविषयी आपण जाणून घेणार आहोत.   

3/7

कांचे (2015)

'कांचे' हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे निर्देशन राधाकृष्ण जगरलामुडी यांनी केले होते. वरुण तेजसोबत प्रज्ञा जायसवाल आणि निकितिन धीरसुद्धा झळकले. दोन व्यक्तींमधील जात आणि सामाजिक परिस्थितीवरून होणाऱ्या वादाशी संबंधित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटाची कथा एका गावातून सुरू होते आणि हळूहळू वाढत दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपातील युद्धग्रस्त भागात पोहोचते. 18 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 27 कोटींची कमाई केली. 'कांचे' या चित्रपटाचे 7.8 इतके रेटिंग आहे.  

4/7

फिदा (2017)

2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फिदा' या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर कम्मुला यांनी केले होते. हा चित्रपट दक्षिणात्य चित्रपटातील सर्वाधिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. दोन बहिणींच्या लग्नाबाबतीत या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात वरुण तेजसोबत साई पल्लवी आणि साई चंद यांनीसुद्धा काम केले आहे. वेगवेगळ्या जगातील वरुण आणि भानूची ही कथा आहे, पण त्यांच्या नात्याला अनेक आव्हाने आहेत. 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 92 कोटींची कमाई केली होती. त्याचे रेटिंग 7.4 आहे.  

5/7

थोली प्रेमा (2018)

थोली प्रेमा हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. वेंकी एटलुरी हे या चित्रपटाचे निर्देशक आहेत. वरुण तेजसोबत राशि खन्ना आणि प्रियदर्शनी पुलिकोंडा यांनीदेखील या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात आदित्य आणि वर्षाची प्रेमकहानी दाखवली गेली आहे. हा चित्रपट 20 करोडच्या बजेटमध्ये बनवला गेला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 45 करोडची कमाई केली आहे. या चित्रपटाचे रेटिंग 7.2 आहे.  

6/7

एफ2: फन अ‍ॅंड फ्रस्ट्रेशन (2019)

'एफ2: फन अ‍ॅंड फ्रस्ट्रेशन' हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला असून अनिल रविपुडी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. वरुणसोबत तमन्ना भाटिया, व्यंकटेश दग्गुबाती आणि अनुसूया भारद्वाज या चित्रपटात झळकले आहेत. वरुण आणि वेंकीच्या लग्नावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. प्रेक्षकांना या चित्रपटात खूपच गंमतीशीर सीन्स पाहायला मिळतात. 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 132 कोटींची कमाई केली असून या चित्रपटाचे रेटिंग 6.1 आहे.  

7/7

गड्डालकोंडा गणेश (2019)

हरीश शंकर यांनी दिग्दर्शित केलेला 'गड्डालकोंडा गणेश' हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. वरुणसोबत अथर्वा मुरली आणि मिर्नालिनी रवि यांनी या चित्रपटात काम केले आहे. 'गड्डालकोंडा गणेश'ची कथा चित्रपटाच्या निर्मात्याशी निगडीत आहे. यामध्ये निर्मात्याच्या चित्रपट बनवण्याची मेहनत दाखवली गेली आहे. 30 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 41 कोटींची कमाई केली आहे. 6.2 अशी या चित्रपटाची रेटिंग आहे.