WPL लिलावात वृंदा दिनेश बनली करोडपती, आता बालपणीचे 'हे' स्वप्न करणार पूर्ण

Vrinda Dinesh: वृंदा सध्या 23 वर्षांखालील महिला टी-20 ट्रॉफीच्या तयारीसाठी रायपूरमध्ये आहे.

Pravin Dabholkar | Dec 11, 2023, 11:18 AM IST

Vrinda Dinesh: मी व्हिडीओ कॉल केला नाही कारण तिच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नव्हती', असे वृंदाने सांगितले. 

1/8

WPL लिलावात वृंदा दिनेश बनली करोडपती, आता बालपणीचे 'हे' स्वप्न करणार पूर्ण

Vrinda Dinesh became a millionaire in WPL 2024 auction UP Warriors Player Fulfill childhood dream

Vrinda Dinesh: महिला प्रीमियर लीग (WPL-2024) च्या आगामी हंगामापूर्वी मुंबईत खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील या लिलावात वृंदा दिनेश हिच्यावर 1.30 कोटी रुपयांची बोली लागली.

2/8

हाक मारण्याचे धाडस नाही

Vrinda Dinesh became a millionaire in WPL 2024 auction UP Warriors Player Fulfill childhood dream

लिलावानंतर वृंदा इतकी भावूक झाली होती की तिला आईला हाक मारण्याचे धाडस करता आले नाही. असे असताना तिला आता बालपणीचे 'ते' स्वप्न पूर्ण करायचे आहे. 

3/8

लिलावात दुसऱ्या क्रमांकावर

Vrinda Dinesh became a millionaire in WPL 2024 auction UP Warriors Player Fulfill childhood dream

22 वर्षीय वृंदा दिनेश शनिवारी WPL लिलावात दुसऱ्या क्रमांकावर विकली जाणारी 'अनकॅप्ड' (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेली) भारतीय बनली. भारताच्या काश्वी गौतमला गुजरात जायंट्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले. जी या लिलावात सर्वात महागडी अनकॅप्ड खेळाडू ठरली.

4/8

आईला व्हिडीओ कॉल नाही

Vrinda Dinesh became a millionaire in WPL 2024 auction UP Warriors Player Fulfill childhood dream

जेव्हा यूपी वॉरियर्सने कर्नाटकची बॅटर वृंदाला विकत घेतले तेव्हा तिने रायपूरहून बेंगळुरूमध्ये तिच्या व्हिडीओ कॉल केला नाही. आई समोर आल्यावर आपण भावूक होऊ हे वृंदाला माहिती होतं. 'मला वाटते तिच्या (आईच्या) डोळ्यात अश्रू आले होते. मी व्हिडीओ कॉल केला नाही कारण तिच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नव्हती', असे तिने सांगितले. 

5/8

कामगिरीवर परिणाम?

Vrinda Dinesh became a millionaire in WPL 2024 auction UP Warriors Player Fulfill childhood dream

वृंदा सध्या 23 वर्षांखालील महिला टी-20 ट्रॉफीच्या तयारीसाठी रायपूरमध्ये आहे. मोठ्या रकमेत विक्री केल्याने खेळाडूंवर दबाव येतो ज्यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो, यावर तिला प्रश्न विचारण्यात आला. 

6/8

खेळाचा आनंद

Vrinda Dinesh became a millionaire in WPL 2024 auction UP Warriors Player Fulfill childhood dream

'मोठ्या रकमेत विकले जाणे माझ्या अधिकारात नाही. या रकमेने फारसा फरक पडेल असे मला वाटत नाही कारण शेवटी मी खेळण्यासाठी आणि खेळाचा आनंद घेण्यासाठी आले आहे, असे तिने सांगितले.

7/8

रकमेचे काय करणार?

Vrinda Dinesh became a millionaire in WPL 2024 auction UP Warriors Player Fulfill childhood dream

'संघाने माझी लीगमध्ये खेळण्यासाठी निवड केली आहे. मला माझे सर्वोत्तम द्यायचे आहे, असे वृंदा म्हणाली. या रकमेचे तू काय करणार? असे वृंदाला विचारले असता, मी आधीच एक योजना बनवली होती, असे ती सांगते. 

8/8

कार घेणार

Vrinda Dinesh became a millionaire in WPL 2024 auction UP Warriors Player Fulfill childhood dream

माझे आई-वडिल खूप भारावून गेले होते. ते माझ्यासाठी खूप आनंदी होते. मला त्यांचा अभिमान वाटतो. माझ्या आई-वडिलांना त्यांनी नेहमी स्वप्नात पाहिलेली कार मी देईन. या क्षणी हे माझे पहिले लक्ष्य आहे आणि आपण नंतर पाहू, असे तिने सांगितले.