Virat Kohli चा अलिबागमधील 20 कोटींचं फार्महाऊस पाहिलं का? पाहा PHOTO

Virat Kohli New Villa : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli)अलिबागमध्ये आलिशान बंगला (Alibaug Villa)खरेदी केला आहे. अलिबागच्या आवास लिव्हिंगमध्ये 2000 चौरस फुटांचा हा व्हिला विकत घेतला आहे. विराट कोहलीची ही अलिबाग परिसरातील दुसरी मालमत्ता आहे. नेमक्या हा आलिशान व्हिला कसा आहे? या व्हिलाची किंमत किती आहे? हे जाणून घेऊयात.  

Jan 21, 2024, 14:08 PM IST
1/5

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने अलिबागमध्ये आलिशान बंगला खरेदी केला आहे. अलिबागच्या आवास लिव्हिंगमध्ये 2000 चौरस फुटांचा हा व्हिला विकत घेतला आहे.

2/5

विराट कोहलीने आवास लिव्हिंगमध्ये 2000 चौरस फुटाचा व्हिला विकत घेतला आहे. अलिबाग परिसरात असलेल्या या लक्झरी व्हिलाची किंमत 6 कोटी रुपये आहे. 

3/5

अलिबाग परिसरात असलेला विराटचा हा व्हिलाही अतिशय आलिशान आहे. यापूर्वी त्यांनी पत्नी अनुष्का शर्मासोबत मुंबईतील वरळी भागातील ओंकार टॉवरमध्ये घर खरेदी केले होते. 

4/5

विराट कोहलीने अलिबाग परिसरात खरेदी केलेली ही दुसरी मालमत्ता आहे. 1 सप्टेंबर 2022 रोजी, विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनी गिरड गावात 36,059 चौरस फूट पसरलेले फार्महाऊस 19.24 कोटी रुपयांना विकत घेतले होते.  

5/5

समीरा लँड अॅसेट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सोनाली राजपूत यांच्याकडून खरेदी केली होती. विराटचा भाऊ विकास कोहली त्याच्या वतीने अधिकृत स्वाक्षरी करणारा ठरला. त्यावेळी त्यांनी 1.15 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले होते. अलिबागमधील दोन्हीही बंगले खुप आलिषान आहेत.