फ्रिजमधील पदार्थ किती तासांनी खाल्लं पाहिजे ?

फ्रिजमधील पदार्थ किती तासांनी खाल्लं पाहिजे ?

Jan 21, 2024, 13:54 PM IST

फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न आपण किती तासांनंतर खाऊ शकतो आणि कोणता पदार्थ किती वेळ फ्रीजमध्ये ठेवावा. याबद्दल जाणून घेऊया.  

 

1/9

आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला वेळेची खूप मर्यादा आली आहे. व्यस्त जीवनशैलीत निवांत वेळ काढून गरमा गरम जेवण बनवून खायलाही वेळ नसतो.

2/9

कामावर जाणारी बहुतेक लोक हे वेळ वाचवण्यासाठी सकाळसाठी रात्रीच जेवण बनवून फ्रीजमध्ये ठेवतात. मात्र फ्रिजमध्ये बराच काळ ठेवलेले हे अन्न आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं. 

3/9

फ्रिजमधील कुठले पदार्थ किती तासांनंतर आपल्यासाठी विष ठरतात ते जाणून घ्या.

4/9

भात

फ्रिजमधील उरलेला भात  जास्तीत जास्त 2 दिवस खाऊ शकता. नाहीतर तो आपल्या शरीरासाठी घातक आहे. शिवाय फ्रिजमध्ये ठेवलेला भात खाण्यपूर्वी तो चांगला गरम करुन खावा. 

5/9

चपाती

सहसा फ्रिजमध्ये चपाती आपण ठेवत नाही, पण गव्हाचं पीठ किंवा चपात्या फ्रिजमध्ये ठेवल्यावर 12 ते 13 तासांनी ते आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतात. 

6/9

डाळ

फ्रिजमधील उरलेली डाळ ही 2 दिवसांपेक्षा जास्त दिवसांनी खाल्ल्याने आपल्याला पोटाची समस्या होऊ शकते. 

7/9

फळं

कधीकधी आपण फळं कापून फ्रीजमध्ये ठेवतो. पण ही फळं 4 तासांच्या आत खावीत कारण त्या नंतर ती फळं खराब होण्यास सुरुवात होते. 

8/9

केळी

केळी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये केळी ठेवल्यास त्वरीत काळी पडते. केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातून इथिलीन गॅस सोडला जातो. ज्यामुळे फ्रिजमध्ये असलेले इतर फळं देखील लवकर पिकतात.

9/9

कलिंगड

कलिंगड फ्रिजमध्ये ठेवले तर पौष्टिक मूल्य कमी होतात आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका देखील वाढतो. कापलेल्या कलिंगडात बॅक्टेरिया वाढतात, हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे चुकूनही कलिंगड फ्रिजमध्ये ठेवू नका.