'हा' बॉलिवूड अभिनेता जवानांसाठी बनवतोय जेवण

Aug 02, 2019, 18:37 PM IST
1/8

सुपरहिट 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटातून सैनिकाची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल सध्या 14 हजार फूटांच्या उंचीवर भारताच्या सैनिकांसोबत आहे. पण विकी कौशलच्या हातात रायफल नाही तर लाटणं आहे...आश्चर्य वाटलं ना...

2/8

पण 15 ऑगस्टच्या आधीच विकी भारत-चीन बॉर्डरवर पोहचला आहे. विकी भारत-चीन बॉर्डरवर एका स्पेशल शोचं शूटिंग करण्यासाठी पोहचला आहे. 

3/8

इथे विकी 14 हजार फूटांवर देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या आपल्या जवानांसोबत राहत आहे. 

4/8

सोशल मीडियावर फोटो शेअर करत विकीने याबाबतची माहिती दिली. 'पहिल्यांदाच बनवलेली पोळी...तीही सैनिकांसाठी' अशा आषयाची पोस्ट लिहत विकी कौशलने फोटो शेअर केला आहे.

5/8

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमधून, विकी सैनिकांसोबत जेवण बनवण्यापासून त्यांच्यासोबत प्रत्येक अॅक्टिव्हिटीमध्ये सहभाग झाल्याचं दिसत आहे.

6/8

विकी भारत-चीन बॉर्डरवर कामाचा आनंद घेत असल्याचं दिसत आहे.

7/8

विकी उधम सिंह यांची कहाणी मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.

8/8

विकी लवकरच फील्ड मार्शल मानेकशॉ यांच्या जीवनावर आधारित, मेघना गुलजार यांच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.