SSC Exam: दहावीच्या परीक्षेसाठी अत्यंत कडक नियम; प्रत्येक विद्यार्थ्याची अंगझडती घेणार आणि...

SSC Exam: राज्यात 15 लाख 77 हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. राज्यातील 533 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे.

Mar 02, 2023, 00:19 AM IST

SSC Exam 2023: 3 मार्चपासून दहावीच्या परीक्षा  सुरु होत आहेत. यंदा परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात करण्याचा बोर्डाचा प्रयत्न आहे.  2 मार्च ते 25 मार्च दरम्यान ही परीक्षा होणार आहे. परीक्षेआधी प्रत्येक विद्यार्थ्याची अंगझडती घेऊनच त्याला वर्गात सोडलं जाणार आहे. त्यासाठी पोलिस पाटील, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे. तसंच पेपर सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळणार आहे. 

1/6

गेल्या दोन वर्षात म्हणजे कोरोना काळात ही परीक्षा 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित घेतली होती. यंदा मात्र परीक्षा पारंपरिक पद्धतीने 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित घेण्यात येत आहे.

2/6

 गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यंदा दहावी परीक्षार्थींच्या संख्येत 61 हजार 708 इतकी घट झाली आहे.

3/6

प्रश्नपत्रिका कस्टडीतून केंद्रांवर तसेच केंद्रांतून वर्गापर्यंत जाताना प्रत्येक वेळी चित्रीकरण केले जाणार आहे. जीपीएस ट्रॅकिंग केले जाणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवला जाणार आहे. 

4/6

दहावीच्या परीक्षा केंद्राजवळील पानपट्टी, टायपिंग आणि संगणक सेंटर तसंच इंटरनेट कॅफेही बंद ठेवण्यात येतील.

5/6

परीक्षा‎ केंद्र परीसरातील झेरॉक्स बंद‎ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.‎

6/6

दहावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेत 10 मिनिटांचा वाढीव वेळ मिळणार आहे.