Satpura Range : सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी समाजाचा सर्वात मोठा भोंगऱ्या बाजार

महाराष्ट्र, गुजरात मध्यप्रदेश या राज्यातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या भोंगऱ्या बाजारात सहभागी होतात. या अनोख्या बाजारात रोटी बेटी व्यवहार देखील होत असतो.

Mar 01, 2023, 23:56 PM IST

Culture of jalgaon : आदिवासी समाजाच्या सर्वात मोठया भोंगऱ्या बाजाराला सुरवात झाली असून आदिवासी पावरा बांधवांमध्ये उत्साह संचारला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी (Satpura Range) आदिवासी समाजाचा सर्वात मोठा भोंगऱ्या बाजार भरला आहे.  भोंगऱ्या बाजार भरल्यानंतर होळीला सुरवात होत असते. या बाजाराला जुनी परंपरा असून 1980 साली या बाजाराला सुरवात झाली होती. जळगाव मधील चोपडा तालुक्यातील बडगाव येथून या बाजाराला सुरवात होते. 

1/6

या सणाला मुली आपल्या माहेरी आलेल्या नातेवाईकांना जेवण म्हणुन तुपामध्ये शेवया, गुळ असे पदार्थ ही देतात. आठवडा भर वेगवेगळ्या भोंगऱ्या बाजारांनंतर होळी आणि धुलीवंदन साजरा करून या सणाची सांगता होते..

2/6

सामुहिक नृत्य सादर करीत आपल्या वेगळ्या संस्कृतीचे दर्शन हे आदिवासी बांधव घडवतात. 

3/6

भोंगऱ्या बाजाराच्या ठिकाणी आदिवासी बांधव ढोल, घेवून पारंपारिक पोशाख परिधान करीत दाखल होतात. 

4/6

हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी, पाड्या, वस्त्यावर स्थानिक रहिवाश्यासह बाहेरगावी राहत असलेले पावरा बांधव आपल्या गावी एकत्र येतात आणि हा सण जल्लोषात साजरा करतात. 

5/6

आदिवासी पावरा बांधवाना सर्वांत महत्वाचा व पारंपरिक स्वस्कृतीचे दर्शन घडवणारा उत्सव म्हणजे भोंगऱ्या. दिवाळीला जेवढे महत्व असते, त्यापेक्षाही आदिवासी बांधवामध्ये भोंग ऱ्या सणास अनन्यसाधारण महत्व आहे.

6/6

खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यापासून तर,नंदुरबारच्या धडगाव तडोद्यापर्यन्त आदीवासी (पावरा) बांधवाचे सातपुड्यालगत मोठे वास्तव्य आहे. या बांधवांसाठी महत्वाचा असा सण‌ म्हणजे होळी.