Vande Cargo Train First Look: वंदे भारतनंतर आता येणार Vande Cargo; पहिली झलक समोर

नागरिकांना आणखी सुलभ आणि वेगवान प्रवास करता यावा म्हणून रेल्वे प्रशासनाकडून वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यात येत आहे. वंदे भारतनंतर आता वंदे कार्गो ही रेल्वे धावण्यास सज्ज झाली आहे.

Sep 22, 2024, 16:05 PM IST

नागरिकांना आणखी सुलभ आणि वेगवान प्रवास करता यावा म्हणून रेल्वे प्रशासनाकडून वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यात येत आहे. वंदे भारतनंतर आता वंदे कार्गो ही रेल्वे धावण्यास सज्ज झाली आहे.

1/8

Vande Cargo Train First Look: वंदे भारतनंतर आता येणार Vande Cargo; पहिली झलक समोर

Vande Cargo Train First Look This is how the Vande Bharat goods carrier look like

देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारतनंतर आता रेल्वेने अमृत भारत ट्रेन, वंदे मेट्रो ट्रेन आणि वंदे स्लीपर ट्रेनसारख्या नव्या ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आणल्या आहेत. आता आणखी एक कार्गो ट्रेनदेखील नव्याने रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. 

2/8

Vande Cargo Train First Look This is how the Vande Bharat goods carrier look like

 प्रवाशांना वंदे भारत मेट्रो, स्लीपर या ट्रेन धावण्यास सज्ज झाल्यानंतर आता मालवाहतुकीसाठी कार्गो ट्रेन धावणार आहे. लेटेस्ट टॅक्नलॉजी या ट्रेनमध्ये असणार आहे. रेल्वे देशातील पहिली वंदे कार्गो ट्रेनची पहिली झलक समोर आली आहे. 

3/8

Vande Cargo Train First Look This is how the Vande Bharat goods carrier look like

रेल्वे लवकरच वंदे कार्गो ट्रेनला प्रवाशांच्या सेवेत आणणार आहे. या ट्रेनचा फर्स्ट लूक जारी केला आहे. आता विमानाप्रमाणेच ट्रेनमध्येही पार्सल सप्लाय होणार आहेत.   

4/8

Vande Cargo Train First Look This is how the Vande Bharat goods carrier look like

देशात आधीपासूनच वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन, अमृत भारत ट्रेन, वंदे भारत ट्रेन, वंदे मेट्रो( नमो भारत रॅपिड रेल) चालवण्यात येणार आहेत. याच धर्तीवर आता वंदे भारत कार्गो ट्रेन धावण्यास सज्ज झाली आहे. 

5/8

Vande Cargo Train First Look This is how the Vande Bharat goods carrier look like

वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर आता माल वाहतूक करण्यासाठी हायस्पीड मालगाड्या चालवण्याची तयारी सुरू आहे. रेल्वे सेवा अधिक चांगली आणि आधुनिक करण्यावर भर देत आहे. 

6/8

Vande Cargo Train First Look This is how the Vande Bharat goods carrier look like

चेन्नई येथील रेल्वे कोच फॅक्ट्रीत वंदे कार्गो ट्रेनचं काम सुरू आहे. ज्या प्लॅटफॉर्मवर वंदे भारत आणि वंदे मेट्रो ट्रेनच्या कोचचे काम करण्यात आले आहे तिथेच हाय स्पीड वंदे कार्गो तयार होत आहे.

7/8

Vande Cargo Train First Look This is how the Vande Bharat goods carrier look like

कमी अतंर असलेल्या शहरांत वंदे भारत कार्गो ट्रेन चालवण्यात येण्याची शक्यता आहे. या Vande Cargoमध्ये प्रवाशांसाठी कोणतीही सीट नसणार आहे.

8/8

Vande Cargo Train First Look This is how the Vande Bharat goods carrier look like

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या Vande Cargo गाड्यांचा वापर कमी वेळेत एका शहरातून दुस-या शहरात सुलभ आणि सुरक्षित माल वाहतुकीसाठी केला जाईल. या Vande Cargo गाड्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्णपणे तयार होतील.