RRB NTPC ऑनलाइन अर्ज कसा भरायचा? पाहा स्टेप बाय स्टेप माहिती

RRB NTPC Apply Online 2024: Railway NTPC भर्ती 2024 चा अर्ज कसा भरायचा? वाचा संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती. 

| Sep 22, 2024, 15:45 PM IST
1/6

वेबसाइट

RRB NTPC च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम www.rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.

2/6

नोंदणी करा

तुम्ही RRB भरतीसाठी पहिल्यांदाच अर्ज करत असाल, तर Apply विभागात जाऊन आणि Create an Account च्या लिंकवर क्लिक करून तुमची नोंदणी पूर्ण करा.

3/6

लॉग इन करा

जर तुम्ही आधीच नोंदणीकृत असाल तर तुमचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.

4/6

सर्व तपशील भरा

त्यानंतर NTPC फॉर्म भरण्यासाठी डॅशबोर्ड तुमच्या समोर उघडेल . त्यात विचारलेले सर्व तपशील तुम्ही काळजीपूर्वक भरा.

5/6

फोटो आणि स्वाक्षरी

शैक्षणिक माहिती भरल्यानंतर तुम्हाला अपलोड प्रोफाइल दस्तऐवज विभागात फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. यामध्ये फोटोचा आकार 30KB ते 70KB पेक्षा जास्त नसावा आणि स्वाक्षरीचा आकार 50mm x 20mm पेक्षा जास्त नसावा.  

6/6

फी सबमिट करा

त्यानंतर शेवटी प्राधान्य निवडा आणि अर्ज फी सबमिट करा आणि फॉर्मची अंतिम प्रिंटआउट घ्या.