Manmohan Singh: 2 फ्लॅट, बँक बॅलेन्स अन्..., मागे किती संपत्ती सोडून गेले माजी PM? एका पैशाचंही कर्ज नाही

Manmohan Singh Net Worth What Former PM Left Behind: मनमोहन सिंग यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दोन वेळा पंतप्रधानपद भूषवणारे मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या वेळी त्यांच्याकडे एकूण किती संपत्ती होती? त्यांच्याकडे कोणती कार होती? किती घरं होती? याबद्दल जाणून घेऊयात...

| Dec 27, 2024, 07:35 AM IST
1/12

manmohansingh

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी 26 डिसेंबर रोजी नवी दिल्लीमधील 'एम्स' रुग्णालयामध्ये निधन झालं. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांच्या नावावर किती संपत्ती आहे याबद्दलची माहिती इंटरनेटवर शोधली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात माजी पंतप्रधानांच्या निधनाच्या वेळी त्यांच्या नावावर किती संपत्ती होती...

2/12

manmohansingh

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री नवी दिल्लीमधील 'एम्स' रुग्णायामध्ये वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. मनोहन सिंग यांच्या पार्थिवावर नवी दिल्लीमध्ये संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

3/12

manmohansingh

मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2009 दरम्यान आणि त्यानंतर 2009 ते 2014 दरम्यान दोन वेळा पंतप्रधानपद भूषवलं. त्यापूर्वी मनमोहन सिंग यांनी पीव्ही नरसिंम्हा राव हे पंतप्रधान असताना देशाचं अर्थमंत्रीपद भूषवलं होतं. 

4/12

manmohansingh

1991 साली भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिकीकरण्याच्या शर्यतीत ठेवण्यासाठी घेण्यात आलेला मुक्त अर्थव्यवस्थेचा निर्णय हा मनमोहन सिंग अर्थमंत्री असतानाच घेण्यात आलेला. भारताच्या आर्थिक विकासामध्ये मोलाचा हातभार लावणाऱ्या मनमोहन सिंग यांनी 2014 साली सक्रीय राजकारणामधून निवृत्ती घेतली. ते सध्या राज्यसभेचे खासदार होते.   

5/12

manmohansingh

2018 साली मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळेस त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये सिंग यांनी त्यांची एकूण संपत्ती किती आहे याची माहिती दिली होती. आपल्या नावावर किती घरं आहेत कोणकोणती संपत्ती आहे याचा तपशील त्यांनी दिलेला.

6/12

manmohansingh

मनमोहन सिंग यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकूण संपत्ती 15 कोटी 77 लाख रुपये असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच दिल्ली आणि चंदीगडमध्ये आपल्या नावावर फ्लॅट्स असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं.  

7/12

manmohansingh

विशेष म्हणजे मनमोहन सिंग यांनी आपल्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नसल्याचं जाहीर केलं होतं. यावरुनच मनमोहन सिंग यांचं अर्थमंत्री म्हणून नियोजन जितकं अचूक होतं तितकेच ते वैयक्तिक स्तरावरही उत्तम आर्थिक व्यवस्थापन करायचे हे स्पष्ट होतं.

8/12

manmohansingh

2018-19 साली मनमोहन सिंग यांची एकूण कमाई 90 लाख रुपये इतकी होती. याचबरोबर त्यांच्या नावावर घरं आणि बँक खात्यांवर काही रक्कमही होती.   

9/12

manmohansingh

दिल्ली आणि चंढीगडमधील मनमोहन सिंग यांच्या नावे असलेल्या घरांची एकूण किंमत 11 वर्षांपूर्वी 7.27 कोटी रुपये इतकी होती. त्यानंतर या संपत्तीची किंमत झपाट्याने वाढत गेली.  

10/12

manmohansingh

2013 मध्ये मनमोहन सिंग यांच्या एसबीआयच्या खात्यावर 3.46 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. मनमोहन सिंग यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्यावर कोणतेही कर्ज नसल्याचं नमूद केलं होतं. त्यावेळेस त्यांच्याकडे 30 हजार रुपयांची रोख रक्कम होती.

11/12

manmohansingh

2013 साली मनमोहन सिंग यांच्याकडे एकूण 3.86 लाख रुपयांचे दागिने होते. अर्थात आता या दागिन्यांची किंमतही वाढली असणार. तसेच त्यांच्याकडील 12 लाख 76 हजार रुपये पोस्टल सेव्हिंग्स स्कीममध्ये गुंतवण्यात आलेले.

12/12

manmohansingh

अनेक सरकारी गाड्या मनमोहन सिंग यांच्या सेवेत होत्या. मात्र मनमोहन सिंग यांच्याकडे 1996 सालाचं मॉडेल असलेली मारुती 800 कार होती. त्यांच्या नावावर असलेलं हे एकमेव वाहन होतं.