Happy Teddy Day 2023: तुमच्या प्रियजनांना भेटवस्तू देणार असाल तर 'हे' Teddy Bear आहेत उत्तम पर्याय

Teddy Day: जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना टेडी गिफ्ट करणार असाल तर प्रत्येक रंगाचे टेडीचा वेगळा अर्थ आहे हे जाणून घ्या. हे तुमचे प्रेमळ नाते किंवा मैत्रीचे नाते देखील डिफाइन करते. 

Feb 10, 2023, 09:45 AM IST

Happy Teddy Day 2023: व्हॅलेंटाईन वीकचा (Valentine's Week) आज चौथा दिवस म्हणजेच 10 फेब्रुवारीला टेडी डे (Happy Teddy Day 2023) साजरा केला जातो. या खास आठवड्यात प्रियकरला टेडी गिफ्ट (Teddy Gift) करण्यालाही विशेष महत्त्व आहे.  जर तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर इथे मिळणारे टेडी बिअर्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. हे सर्व टेडी बिअर्स तुम्हाला वेगवेगळ्या आकारात उपलब्ध मिळतील. तसेच टेडी गिफ्ट करण्यापूर्वी हे जाणून घ्या की या टेडीचे रंग खूप खास असतात. प्रत्येक रंगाचा स्वतःचा अर्थ असतो जो तुमचे नाते देखील डिफाइन करतो. गुलाबी किंवा लाल रंगाचे टेडी बेअर देण्यापूर्वी या रंगांचा अर्थही जाणून घ्या.

1/5

ऑरेंज टेडी बेअर

ऑरेंज टेडी बेअर एखाद्या व्यक्तीला तो तुमच्या आयुष्यात किती खास आहे हे व्यक्त करण्यासाठी भेट देऊ शकता. याद्वारे तुम्ही सांगू शकता की तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती किती खास आहे आणि त्यांच्या येण्याने होप आणि आनंद आला आहे.

2/5

ग्रीन टेडी बेअर

तुमचा प्रस्ताव नाकारण्यात आला होता पण तरीही तुम्ही त्याच्यावर प्रेम करता हे सांगायचे असेल तर हिरव्या रंगाचा टेडी बेअर गिफ्ट द्या. हिरवा रंग दर्शवितो की आपण नेहमी नात्यात कमिटेड राहाल. 

3/5

निळा टेडी बेअर

जर तुम्हाला तुमच्या खास व्यक्तीला वचन द्यायचे असेल आणि नात्यात कमिटमेंट दाखवायची असेल तर निळ्या रंगाचा टेडी बेअर द्या. ही भेट दर्शवेल की तुम्ही तुमच्या जोडीदाराला नेहमी एकत्र पाहू इच्छित आहात आणि नात्यात कमिटमेंट करत आहात. 

4/5

गुलाबी टेडी

गुलाबी टेडी म्हणजे मैत्री. प्रेमाचा प्रस्ताव स्विकारला आहे हे कुणाला सांगायचे असेल तर गुलाबी रंगाचा टेडी भेट म्हणून द्या.

5/5

लाल रंगाचा टेडी

लाल रंग प्रेमाचे प्रतीक आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला लाल रंगाचा टेडी देणार असाल तर प्रेम आणि पॅशनचे प्रतीक असलेल्या लाल रंगाच्या टेडीच्या सहाय्याने तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता हे सांगा.