कोल्हापूर अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; गाभारा दर्शन भाविकांसाठी बंद

साडेतीन शक्तीपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मूर्तीला संवर्धन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 

| Apr 14, 2024, 12:04 PM IST

Shree Karveer Niwasini Ambabai: साडेतीन शक्तीपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मूर्तीला संवर्धन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 

1/7

कोल्हापूर अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; गाभारा दर्शन भाविकांसाठी बंद

Urgent Call for Conservation of kolhapur s Ambabai Devi Idol

 करवीर निवासिनी अंबाबाई मूर्ती सुस्थितीत राहावी यासाठी भारतीय पुरातत्व विभागाकडून मूर्ती संवर्धन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेची सुरुवात आज रविवारी 14 एप्रिल रोजी सुरू झाली आहे. तर, सोमवार 15 एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. 

2/7

गाभाऱ्यातून दर्शन बंद

Urgent Call for Conservation of kolhapur s Ambabai Devi Idol

आज पासून दोन दिवस ही रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू राहणार आहे. या संवर्धन प्रक्रियेदरम्यान भाविकांना अंबाबाई देवीचे गाभाऱ्यातून दर्शन बंद करण्यात आल आहे. 

3/7

दोन दिवस प्रक्रिया

Urgent Call for Conservation of kolhapur s Ambabai Devi Idol

अंबाबाई देवीची उत्सव मूर्ती ही दर्शनासाठी गाभाऱ्याच्या बाहेर ठेवली असून पितळी उंबऱ्या बाहेरून भाविकांना दर्शन घेता येणार आहे. ही रासायनिक संवर्धन प्रक्रिया रविवार आणि सोमवार अशी दोन दिवस सुरू राहणार आहे.

4/7

2015 साली रासायनिक संवर्धन

Urgent Call for Conservation of kolhapur s Ambabai Devi Idol

2015 साली झालेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर अंबाबाई देवीच्या मूर्तीला ज्या ठिकाणी संवर्धन केल आहे त्या ठिकाणी तडे गेल्याचा अहवाल नुकताच न्यायालयात सादर करण्यात आला होता. 

5/7

2015 आणि 2021 मध्ये मूर्तीचे संवर्धन

Urgent Call for Conservation of kolhapur s Ambabai Devi Idol

2015 आणि 2021 मध्ये मूर्तीचे संवर्धन करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी संवर्धनावेळी काही अनुचित बाबी निदर्शनास आल्याचे समोर आले होते.

6/7

मूर्तीची झीज

Urgent Call for Conservation of kolhapur s Ambabai Devi Idol

गत संवर्धनासाठी वापरण्यात आलेले पदार्थ मूळ मूर्तीच्या पाषाणाशी जुळले नसल्यामुळं अनेक ठिकाणी तडे गेल्याने झीज झाल्याचे अहवालात नमूद आहे.

7/7

रासायनिक संवर्धन प्रक्रिया

Urgent Call for Conservation of kolhapur s Ambabai Devi Idol

मूर्तीची झिज रोखण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाच्या पुढाकारातून आजपासून अंबाबाई मूर्तीची रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.