IAS, IPS ना किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? सर्वकाही जाणून घ्या

आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना किती पगार मिळतो? काय सुविधा मिळतात? हे तुम्हाला माहिती आहे का?

Pravin Dabholkar | Apr 16, 2024, 17:41 PM IST

IAS IPS Salary And facility: आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना किती पगार मिळतो? काय सुविधा मिळतात? हे तुम्हाला माहिती आहे का?

1/8

IAS, IPS ना किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? सर्वकाही जाणून घ्या

UPSC Result 2024 IAS IPS Salary And facility Career Marathi News

IAS IPS Salary: नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. याअंतर्गत आयएएसच्या 180 जागा, आयपीएसच्या 200 तर आयएफएसच्या 37  रिक्त जागा भरण्यात येत आहेत. या परीक्षेतून देशाला नवे आयएएस, आयपीएस अधिकारी मिळाले. पण या अधिकाऱ्यांना किती पगार मिळतो? काय सुविधा मिळतात? हे तुम्हाला माहिती आहे का?

2/8

प्रशासन आणि पोलिसांमध्ये सर्वोच्च पदांवर

UPSC Result 2024 IAS IPS Salary And facility Career Marathi News

नागरी सेवा परीक्षेत सर्वोच्च रँक मिळवणारे उमेदवार आयएएस होतात. यानंतर आयपीएसचे स्थान येते. या उच्च श्रेणीधारकांची विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते. आयएएस आणि आयपीएस हे प्रशासन आणि पोलिसांमध्ये सर्वोच्च पदांवर काम करतात. 

3/8

वाढत्या महागाई दरासह इतर घटक

UPSC Result 2024 IAS IPS Salary And facility Career Marathi News

भारत सरकारच्या कोणत्याही मंत्रालयातील, कोणत्याही विभागातील लहान ते मोठ्या पदापर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणारा पगार वेतन आयोगाद्वारे निश्चित केला जातो. हा पगार ठरवण्यासाठी सरकारची एक समिती काम करते. वाढत्या महागाई दरासह इतर घटकांच्या आधारे कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला किती पगार मिळावा हे या समितीद्वारे ठरवले जाते. 

4/8

IPS किंवा IAS चा सुरुवातीचा पगार

UPSC Result 2024 IAS IPS Salary And facility Career Marathi News

आयएएस अधिकाऱ्याला मिळणारा पगार हे त्याचे पद, स्तर आणि ज्येष्ठता यावर अवलंबून असतो. 7 व्या वेतन आयोगानुसार, सध्या IPS किंवा IAS चा प्रारंभिक पगार 56,100 रुपये प्रति महिना आहे. हा फक्त मूळ पगार आहे. 

5/8

काय मिळतात सुविधा?

UPSC Result 2024 IAS IPS Salary And facility Career Marathi News

आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांना दरमहा टीए, डीए, एचआरए, मोबाईल इत्यादींसह अनेक भत्ते मिळतात. एकंदरीत, आयपीएस किंवा आयएएस अधिकाऱ्याचा सुरुवातीचा पगार दरमहा एक लाख रुपयांपेक्षा जास्त असतो. टीए, डीए आणि डीआरए हे त्यांच्या पोस्टिंगवर अवलंबून असते.

6/8

सर्वोच्च दर्जा कॅबिनेट सचिवाचा

UPSC Result 2024 IAS IPS Salary And facility Career Marathi News

पदोन्नती आणि पदानुसार आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचा पगारही वाढतो. आयएएस अधिकाऱ्याचा सर्वोच्च दर्जा कॅबिनेट सचिवाचा असतो. या पदावर पोहोचल्यानंतर त्यांना दरमहा अडीच लाख रुपये वेतन (बेसिक) मिळते. साधारणपणे, आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्याचे मूळ वेतन 56 हजार 100 ते 2 लाख 25 हजार रुपये असते. याव्यतिरिक्त त्यांना भत्ते स्वतंत्रपणे दिले जातात. 

7/8

वेतनाव्यतिरिक्त कोणत्या सुविधा?

UPSC Result 2024 IAS IPS Salary And facility Career Marathi News

आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांच्या वेतनाव्यतिरिक्त पे बँडनुसार इतर लक्झरी सुविधा देखील मिळतात. घर, सुरक्षा, स्वयंपाकी, हाऊस हेल्प, वाहन, मर्यादित पेट्रोल आणि ड्रायव्हरची सुविधा दिली जाते. आयएएस पोस्टिंग छोटय़ा जिल्ह्यांमध्ये असेल, तर सहसा मोठा बंगला, कार, सुरक्षा, घर मदतनीस अशी सुरक्षा पुरवली जाते.

8/8

निवृत्ती वेतन

UPSC Result 2024 IAS IPS Salary And facility Career Marathi News

इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आयपीएस आणि आयएएस यांनाही पूर्वी पेन्शन मिळत असे. आता तुम्ही नवीन पेन्शन योजनेनुसार इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे गुंतवणूक केल्यावर त्यानुसार निवृत्तीनंतर पेन्शन मिळते.