इथं लग्नाच्या एक महिना आधीपासूनच रडू लागते नवरी, रोज करावी लागते रडण्याची प्रॅक्टिस

लग्न हा व्यक्तीच्या जीवनातील एक सर्वात महत्वाचा आणि पवित्र संस्कार आहे. साधारपणे तुम्ही पाहिलं असेल की लग्न झाल्यावर नवी नवरी माहेर सोडून सासरी जाताना ती आणि तिच्या घरचे भावूक होतात आणि त्यांना रडू येतं. पण तुम्हाला माहितीये का? एक असं ठिकाण आहे जिथे लग्नाच्या एक महिना आधीपासूनच नवरी रडू लागते. आज तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. 

| Sep 30, 2024, 17:03 PM IST
1/7

लग्नाचं नातं हे खूप पवित्र असतं. परंतू तुम्ही पाहिलं असेल की भारतात होणाऱ्या लग्नांमध्ये नवरी सासरी जाताना पाठवणीच्यावेळी भावूक होऊन रडते. नवरी लाग झाल्यावर आपलं घर सोडून ती एका नवऱ्याच्या घरी जाते. लग्नानंतर त्याच घराला ती आपलं घर मानते. 

2/7

भारताप्रमाणे चीनमध्येही लग्नानंतर मुली माहेर सोडून सासरी जातात आणि पाठवणीच्या वेळी भावुक होतात. मात्र चीनमध्ये एक विचित्र परंपरा असून इथे लग्नाच्यावेळी नवरीला रडावेच लागते, जर नवरीला यावेळी रडू आले नाही तर तिला रडू येण्यासाठी चक्क मारले देखील जाते. 

3/7

तुजिया जमातीचे लोक हजारो वर्षांपासून चीनच्या दक्षिण-पश्चिम प्रांत सिचुआनमध्ये राहतात. येथे एक विचित्र परंपरा पाळली जाते, ज्यामध्ये वधूला तिच्या लग्नात रडणे आवश्यक आहे. ऑडिटी सेंट्रल वेबसाइटवरील अहवालानुसार, ही या समाजात परंपरा 17 व्या शतकापर्यंत प्रभाविपणे पाळली जायची.   

4/7

1911 मध्ये किंग साम्राज्यापर्यंत त्याचे पालन केले गेले. मात्र, कालांतराने हळूहळू ही प्रथा बंद होत आहे. तज्ज्ञांच्या मते, ही परंपरा 475 ईसापूर्व ते 221 ईसापूर्व दरम्यान सुरू झाली. जेव्हा ज़ाओ राज्याच्या राजकन्येचा विवाह यैन राज्याशी झाला होता. यावेळी त्या राजकन्येची आई मुलीच्या पाठवणीच्यावेळी खूप रडली होती. त्यामुळे राजकन्येचा अश्रूचा बांधही फुटला. विवाहसोहळ्यात रडण्याचा हा इथला पहिलाच प्रसंग मानला जातो.

5/7

जाणकारांनुसार जर नवरी रडली नाही तर गावात ती चेष्टेचा विषय बनते. अशावेळी लोक तिला कुटुंबातील वाईट पीढी मानतात. तसेच जर नवरी पाठवणीच्यावेळी रडली नाही तर अनेकदा तिची आईच तिला मारून रडायला भाग पाडते.  

6/7

चीनमध्ये दक्षिण पश्चिमी प्रांतमध्ये जिथे फक्त नवरी रडण्याची परंपरा आहे त्याच पश्चिमी प्रांतात एक वेगळीच परंपरा आहे. इथे या परंपरेला 'जुओ टांग' असे म्हंटले जाते. ज्याचा अर्थ असतो हॉलमध्ये बसणे

7/7

यात लग्नाच्या एक महिना आधी, होणारी नवरी रात्री एका मोठ्या हॉलमध्ये जाते आणि तिथे बसून सुमारे एक तास रडते. 10 दिवसांनंतर तिची आई सुद्धा तिच्या सोबत सामील होते तर अजून 10 दिवसांनी आजी, बहिणी, काकू आणि काका सर्व एकत्र हॉलमध्ये एक तास रडतात. रडण्यासोबत एक खास गाणे वाजवले जाते, ज्यावर सर्वजण रडतात आणि त्यांना 'क्राइंग मॅरेज सॉंग' असं म्हंटलं जातं.