नाताळच्या सुट्टीत 'हे' 5 चित्रपट नक्कीच पाहा
नाताळ सण हा भारतात सुद्धा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांप्रमाणे इतर लोकांना सुद्धा नाताळाची पार्टी करणे, फिरणे आवडते. आपल्यापैकी बहुतेक जण नाताळच्या पार्ट्या सोडून घरातच राहून सुट्टीचा आनंद लुटण्याचं ठरवतात. त्यांच्यासाठी 5 best चित्रपट
1/7
नाताळ सण हा भारतात सुद्धा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांप्रमाणे इतर लोकांना सुद्धा नाताळाची पार्टी करणे, फिरणे आवडते. आपल्यापैकी बहुतेक जण नाताळच्या पार्ट्या सोडून घरातच राहून सुट्टीचा आनंद लुटण्याचं ठरवतात. मग आता विचार काय करता? चांगले चित्रपट पाहण्याची हीच वेळ आहे. तुम्ही चित्रपट कसे निवडता? confuse असाल तर हे 5 चित्रपट नक्कीच पहा.
2/7
या काळातील सुट्ट्या आपल्या कुटुंबासोबत खास आणि अविस्मरणीय बनवण्याच्या तयारीत असाल तर 'Red One' हा चित्रपट पहायलाच हवा. 'Red One' हा Hollywood चित्रपट असून नव्या विषयावर बनलेला आहे. नाताळ सणात सांताक्लॉजचं विशेष महत्त्व असतं, पण जर सांताच गायब झाला तर... जेव्हा नॉर्थ पोल वरून सांताक्लॉजचं अपहरण होतं तेव्हाची ही गोष्ट आहे. 'ड्वेन जॉनसन' यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. आता या सांताला कसे आणि कुठे शोधणार, हे या चित्रपटात पाहता येणार आहे. 15 नोव्हेंबरला हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला आहे. 'Red One' 'अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ'वर उपलब्ध आहे. हा चित्रपट तुम्ही मुलांसोबत पाहू शकता.
3/7
तुम्हाला ख्रिसमसच्या आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये चित्रपट पहायचा असेल पण तो माहितीपूर्णही असावा तर अशा वेळी 'The Sabarmati Report हा माहितीपट पाहू शकता. हा चित्रपट साल 2002 मध्ये झालेल्या गुजरातच्या 'गोधरा कांड'वर आधारित आहे. विक्रांत मेस्सीच्या दमदार अभिनयासोबतच हा भारतीय चित्रपट थरारक रीतीने सत्य घटना उलगडतो. या घटनेची खरी बाब समीर (विक्रांत मेस्सी) नावाचा पत्रकार लोकांसमोर कशी आणतो हे चित्रपटात पाहता येणार आहे. 15 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 'द साबरमती फाईल्स' चित्रपट Zee5 वर उपलब्ध आहे.
4/7
'All We Imagine as Light'हा वर्षातील बहुचर्चीत चित्रपटांपैकी एक आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दुसरा सर्वात मोठा पुरस्कार मिळाला आहे. ही कथा पार्वती, अनु आणि प्रभा या तीन महिलांची आहे. या केरळहून आलेल्या तीन महिला मुंबईमध्ये टिकून राहण्यासाठी किती धडपड करतात हे या चित्रपटात दाखवलेलं आहे. चित्रपटाची पटकथा अगदी सोपी-सरळ असून कलात्मक पद्धतीने मांडली आहे. पार्वती, अनु आणि प्रभा या तिघींसोबत पुढे नेमकं काय काय घडतं हे या चित्रपटात पाहायला मिळेल. 21 सप्टेंबर 2024 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे.
5/7
'वनवास' ही एका कुटुंबाची आणि त्यातील नात्यांची कथा आहे. मुलांनी टाकून दिलेल्या पित्याचं आयुष्य या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. चित्रपटात नवीन काही नाही. या चित्रपटाची खिळवून ठेवणारी एकमेव बाब म्हणजे चित्रपटातील विनोदी प्रसंग. नाना पाटेकर अभिनीत हा चित्रपट लहान मुलांसोबत पाहण्यासारखा आहे. राजपाल यादवची विनोदी शैली चित्रपटात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करते. लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.
6/7
साऊथ सिनेमा हल्ली नेहमीच एक पाऊल पुढं राहिला आहे. अलिकडेच एक धमाकेदार चित्रपट 'Avesham' प्रदर्शित झाला. कॉलेज गँगवार ते अस्सल गँगवार हा प्रवास जबरदस्त ॲक्शन दाखवणारा हा सिनेमा सध्या त्याच्या पटकथेमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. ही कथा तीन मुलांची असून रॅगिंगपासून वाचण्यासाठी ते गँगस्टरची मदत घेतात. नंतर त्याचा या मुलांवर काय परिणाम होतो हे पाहण्यासारखं आहे. या सुट्टीत हा चित्रपट नक्कीच पहा. 'Avesham' हा 'अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ' या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या सिनेमाला देता येतील तेवढे स्टार कमीच आहेत. तर नक्कीच या सुट्टीत हा चित्रपट पहा.
7/7