अंतराळातून कसा दिसतो जायन्ट हिमालय? अंतराळवीराने शेअर केले चित्तथरारक फोटो समोर!

Himalayas from space: अंतराळातून कसा दिसतो जायन्ट हिमालय? अंतराळवीराने शेअर केले चित्तथरारक फोटो समोर!

Aug 14, 2023, 07:00 AM IST

Images of Himalayas from space:  हिमालय...या शब्दापेक्षा मोठ्या गोष्टींना उपमा मिळू शकत नाही. महाकाय असा हिमालय (Himalayas) आजवर कोणीही पाहिला नाही, असं म्हणतात. याच हिमालयाचे काही चित्तथरारक फोटो समोर आले आहेत.

1/5

हिमालयाच्या मनमोहक प्रतिमा

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर सहा महिन्यांच्या मोहिमेवर असलेले अमेरिकेचे अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांनी अवकाशातील हिमालयाच्या मनमोहक प्रतिमा ट्विटरवर शेअर केल्या आहेत. 

2/5

सुलतान अल नेयादी

भव्य पर्वतचे विस्मयकारक सौंदर्य टिपणारे फोटो सर्वांना मोहित करणारे आहेत, असं सुलतान अल नेयादी यांनी ट्विटरवर लिहिलंय

3/5

अंतराळातून हिमालय

अंतराळातून हिमालय. पृथ्वीवरील समुद्रसपाटीपासूनचे सर्वोच्च बिंदू, हे पर्वत आपल्या ग्रहाच्या समृद्ध निसर्गाच्या प्रतिष्ठित खुणांपैकी एक आहेत, असं म्हणत सुलतान अल नेयादी यांनी फोटो शेअर केले आहेत.

4/5

तिसऱ्या डोळ्यांचे दृष्य

सुलतान अल नेयादी यांनी त्यांच्या ट्विटर हॅडलवर अनेक गोष्टींचे फोटो शेअर केले आहेत. जगाला तिसऱ्या डोळ्यांचे दृष्य अंतराळवीर दाखवत आहेत.

5/5

सोशल मीडिया

अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून सोशल मीडियावर अॅक्सेस करू शकतात. अंतराळातील त्यांच्या अनुभवांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात.