PHOTO : अविवाहित असून एक मुलगा, सुपरस्टार वडिलांचा मुलगा बॉलिवूडमध्ये फ्लॉप; तरी आहे करोडोंची संपत्ती

Entertainment : चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध घराण्यातील वडील सुपरस्टार असूनही मुलगा बॉलिवूडमध्ये आपली जादू चालू शकला नाही. 48 वर्षीय हा अभिनेता आपला आज वाढदिवस साजरा करतोय. अविवाहित असून तो एका मुलगा आहे. 

नेहा चौधरी | Nov 20, 2024, 13:45 PM IST
1/7

सुपरस्टारचा मुलगा जेव्हा 19 वर्षांचा होता तेव्हा त्याने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. करीना कपूरसोबत त्याची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. 23 वर्षांच्या कारकिर्दीत त्याचे 19 चित्रपट फ्लॉप झाले. 

2/7

आम्ही बोलत आहोत, जितेंद्र यांचा मुलगा आणि एकता कपूरचा भाऊ तुषार कपूर अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. तुषारने 'मुझे कुछ कहना है' या चित्रपटातून पदार्पण केलं. 

3/7

यानंतर अभिनेत्याने 'द डर्टी पिक्चर', 'क्या सुपर कूल हैं हम' आणि 'गोलमाल' सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्यांच्या कामाचं खूप कौतुक झालं खरं पण वडिलांसारखे स्टारडम त्याला कमवता आलं नाही. 

4/7

कमी चित्रपट करुनही तो करोडो संपत्तीचा मालक आहे. तुषारने चित्रपटांव्यतिरिक्त जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करत असतो. रिपोर्ट्सनुसार, तुषार कपूर ब्रँड शूटच्या माध्यमातून दर महिन्याला 40 लाख रुपये कमावतो. एका अभिनेत्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे 5 कोटी रुपये आहे.

5/7

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुषार कपूर आज सुमारे 44 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. याशिवाय त्याच्याकडे एक नाही तर अनेक महागड्या गाड्या आहेत. तुषार कपूरच्या गॅरेजमध्ये Porsche Cayenne, Audi Q7 आणि BMW 7 सारख्या महागड्या गाड्या आहेत. 

6/7

तुषार कपूरने लग्नाशिवाय बाप बनून सगळ्यांना चकित केलं. 1 जून 2016 रोजी, तुषार सरोगसीद्वारे एका मुलाचा वडील झाला, ज्याचं नाव त्यानं लक्ष्य ठेवलंय. त्यानंतर त्याला पुन्हा एकदा सरोगसीद्वारे एक मुलगा झाला. 

7/7

नुकतंच एका मुलाखतीत तुषार कपूरला लग्नावरुन प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अभिनेत्याने उत्तर दिलं की,  'मी कधीच लग्न करणार नाही, कारण माझा विचार ठाम आहे. मला स्वतःला कोणासोबत शेअर करायचं नाही. लग्न करण्याचा माझा विचार असता, तर मी सिंगल पेरेंट झालोच नसतो.'