Tulsi Vivah 2022: तुळशी विवाहाच्या दिवशी घरात 'ही' 5 झाडे लावा, हाती पैसाच पैसा

Tulsi Vivah: तुळशी विवाहाच्या दिवशी घरात काही रोपे लावली तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. 

Surendra Gangan | Nov 04, 2022, 10:32 AM IST

Tulsi Vivah information in marathi : हिंदू धर्मात तुळशी विवाहला खूप महत्व आहे. यादिवशी आपल्या घरामध्ये काही वनस्पती लावल्यास आणि त्यांची पूजा केल्याने विशेष फळ मिळते आणि घरामध्ये समृद्धी राहते. त्यामुळे तुम्ही श्रीमंत होऊ शकता. तुळशीविवाहाच्या दिवशी पाच रोपं घरात लावा, देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. तुमच्यासाठी एक शुभ संकेत मिळतील.  तुळशी विवाहाच्या दिवशी घरात काही खास रोपे लावल्यास घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. 

दरम्यान, कार्तिक महिन्यातही काही वनस्पतींची विशेष पूजा करण्याचा नियम आहे. कार्तिकमध्ये तुळशीची पूजा करुन तिच्यासमोर नित्य दिवा लावल्यास शुभफळ प्राप्त होतात आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते, असा समजले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी घरात आणखी काही झाडे लावणे देखील शुभ मानले जाते. ज्यामुळे सुख-समृद्धीसोबतच धनसंपत्ती येते.  

1/5

तुळशीचे रोप  तुळशीचे रोप घरासाठी अतिशय शुभ मानले जाते आणि विष्णूचे प्रिय म्हणून पूजले जाते. तुळशीविवाहाच्या दिवशी ही वनस्पती घरात ठेवणे महत्वाचे असते. असे सांगितले जाते की, जर तुमच्या घरात हे रोप नसेल तर या दिवशी जरुर लावा आणि नियमानुसार त्याची पूजा करा. यानंतर नियमितपणे माता तुळशीला जल अर्पण करुन तिच्यासमोर दिवा लावावा. यामुळे भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि देवी लक्ष्मीची कृपाही कायम राहते, यामुळे कधीही पैशाची कमतरता भासत नाही. 

2/5

शमी वनस्पती  तुळशीच्या पूजेला शमीचे रोपाला महत्व आहे. घरामध्ये शमीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. हे रोप सहसा शनिवारी लावले जाते. कारण ते शनिदेवाचे रोप मानले जाते, परंतु तुळशी विवाहाच्या दिवशी घरात शमीचे रोप लावले तरी तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि शनीदेवाची कृपा प्राप्त होते. मात्र, हे रोप घरातून बाहेर पडताना उजव्या बाजूला असेल अशा ठिकाणी लावावे. हे रोप घरात लावल्याने शनिदोषांपासूनही मुक्ती मिळते. 

3/5

अशोक वनस्पती  तुळशी विवाहातच्यावेळी अशोक वनस्पती ही भाग्यवान वनस्पती म्हणून मानली जाते. अशोक वनस्पती ही दु:खापासून मुक्ती देणारी वनस्पती मानली जाते.  ही वनस्पती सर्व दुःख दूर करते. तुळशी विवाहाच्या दिवशी हे रोप घरामध्ये लावल्यास ते सर्वात शुभ मानले जाते. घरामध्ये लावल्याने गरिबी दूर होते. हे सर्व तणाव दूर करण्यास मदत करते. मात्र, ही वनस्पती घराच्या आत ठेवू नका, तर घराच्या मुख्य दरवाजाबाहेर लावा. 

4/5

कडुलिंबाचे रोप  तुळशी विवाहात कडुलिंबाला महत्व आहे. कडुलिंबाच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो . त्यामुळे ते घरामध्ये नक्कीच लावावे. तुळशी विवाहाच्या दिवशी योग्य दिशेला कडुलिंबाचे रोप लावल्यास कधीही धनाची कमतरता भासत नाही. या वनस्पती घरात राहिल्याने नेहमी सुख-समृद्धी राहते. कडुलिंबाचे रोप घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासही मदत करते . घराच्या दक्षिण दिशेला लावणे सर्वात शुभ मानले जाते. 

5/5

मनी प्लांट  घरासाठी मनी प्लांट खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की घरात मनी प्लांट  लावल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही. ही वनस्पती जितक्या लवकर घरात वाढेल तितक्या लवकर घरात समृद्धीचे दरवाजे उघडतात, असे सांगितले जाते.   (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)