'या' रेस्टॉरंटमध्ये चक्क माकडाच्या हातचं खावं लागत जेवण, लोकंही आवडीनं खातात, पाहा फोटो

Monkey Waiter : जपानमध्ये असे एक रेस्टॉरंट आहे. जिथे माकड पाहुण्यांना जेवण देतात. त्या बदल्यात रेस्टॉरंटचे मालक या माकडांना पगारही देतात. जाणून घेऊया या माकडांना पगारात काय मिळते?

Jan 02, 2023, 15:19 PM IST

या जगामध्ये चित्रविचित्र गोष्टी नेहमीच आपल्या पाहण्यात किंवा वाचण्यात येत असतात. पण एका रेस्टॉरंटमध्ये चक्क माकडे, रेस्टॉरंटमध्ये आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करतात ही कल्पनाच अविश्वसनीय वाटते. पण जपान या देशामध्ये असलेल्या या अनोख्या रेस्टॉरंटमध्ये जर तुम्ही गेलात, तर तुमच्या जेवणाची ऑर्डर  माकडे घेताना दिसत आहे. 

 

1/5

एका रेस्टॉरंटमध्ये चक्क माकडे, रेस्टॉरंटमध्ये आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करतात ही कल्पनाच अविश्वसनीय वाटते. पण जपान या देशामध्ये असलेल्या या अनोख्या रेस्टॉरंटमध्ये जर तुम्ही गेलात तर तुमच्या जेवणाची ऑर्डर घेण्याकरिता कोणी मनुष्य नव्हे तर चक्क एक माकड येते आणि तुमच्या जेवणाची ऑर्डर नोंदवून घेतात. त्याबदल्यात त्यांना पगारही दिला जातो.

2/5

जपानचे कायाबुकिया रेस्टॉरंट खूप प्रसिद्ध आहे. वियर्ड रेस्टॉरंटच्या यादीत या रेस्टॉरंटचा समावेश करण्यात आला आहे. येथे दोन माकडांना वेटर म्हणून काम देण्यात आले आहे. ही माकडे रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करतात. या माकडांना पाहण्यासाठी अनेक लोक लांबून येतात. अनेकजण त्यांना दिलेले जेवण खायला येतात असे म्हणावे लागेल.

3/5

जपानमधील टोकियो येथे असलेल्या कायाबुकिया रेस्टॉरंटच्या मालकाने माकडे किती बुद्धिमान असतात हे सिद्ध केले आहे. जपानमध्ये प्राण्यांना काम करायला लावणाऱ्या किंवा त्यांचे शोषण करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाते. अशा लोकांना कठोर शिक्षा देण्याची तरतूद आहे. 

4/5

अशा परिस्थितीत रेस्टॉरंट मालक सरकारची परवानगी घेतात आणि नंतर माकडांना त्यांच्या जागेवर ठेवतात. यातही काही नियम आहेत. माकडांप्रमाणे आठवड्यातून फक्त 2 दिवस काम करता येते.

5/5

या रेस्टॉरंटची खास गोष्ट म्हणजे येथे दोन माकडे पाहुण्यांचे स्वागत करतात. माकडेच पाहुण्यांना मेन्यू कार्ड देतात आणि त्यांच्याकडून ऑर्डरही घेतात. अन्न देण्याचे कामही माकडे करतात. या रेस्टॉरंटची सर्वात खास गोष्ट म्हणजे ही माकडे ऑफिस स्टाफप्रमाणेच गणवेश घालतात. हे काम करण्याऐवजी त्यांना पगार (monkey salary) ही दिला जातो. माकडांना त्यांच्या आवडीची एक केळी पगार म्हणून दिली जाते.