महिलांसाठी बेस्ट आहेत पोस्टाच्या 'या' 5 योजना; मिळेल भरघोस परतावा

भारत सरकारकडून नागरिकांसाठी वेळोवेळी अनेक सरकारी योजना राबवल्या जातात. नागरिकांच्या आर्थिक फायद्यासाठी या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले जाते. 

Mansi kshirsagar | Oct 04, 2023, 19:40 PM IST

Government Scheme For Women: भारत सरकारकडून नागरिकांसाठी वेळोवेळी अनेक सरकारी योजना राबवल्या जातात. नागरिकांच्या आर्थिक फायद्यासाठी या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले जाते. 

 

1/7

महिलांसाठी बेस्ट आहेत पोस्टाच्या 'या' 5 योजना; मिळेल भरघोस परतावा

Top 5 Government Scheme For Women  know about it

केंद्र सरकारकडून महिलांसाठी अनेक सरकारी योजना राबवल्या जातात. यातून महिला सक्षमीकरण व्हावे, असा उद्देश असतो. तुम्हीदेखील या योजनेचा फायदा घेऊ शकता. महिलांसाठी असलेल्या सरकारच्या योजनांबद्दल जाणून घेऊया. 

2/7

सरकारी योजना

Top 5 Government Scheme For Women  know about it

सरकारी योजनांचा फायदा तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खाते सुरू करुन घेऊ शकता. यात पीपीएफ, महिला सम्मान बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट यासारख्या योजना आहेत. 

3/7

पब्लिक पोव्हिडेंट फंड

Top 5 Government Scheme For Women  know about it

पीपीएफ गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे. या योजनेअंतर्गंत सरकारकडून 7.1 टक्क्यापर्यंत व्याज मिळते. यात कोणताही व्यक्ती जास्तीतजास्त 1.5 लाखापर्यंत गुंतवणुक करु शकतो. यात कर सवलतदेखील मिळते. 

4/7

महिला सन्मान बचत योजना

Top 5 Government Scheme For Women  know about it

केंद्र सरकारने केंद्रीय आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअतंर्गंत 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. यात महिला 2 लाखापर्यंत गुंतवणुक करु शकतात. आणि त्यांचा कार्यकाळही २ वर्षांचा आहे.

5/7

सुकन्या समृद्धी योजना

Top 5 Government Scheme For Women  know about it

ही योजना खासकरुन मुलींसाठी राबवण्यात आली आहे. यात 10 वर्षांपर्यंत मुलगी असल्यास तिच्यानावाने खाते सुरु करता येऊ शकते. तुम्ही यात 250 पासून ते 1.5 लाखापर्यंत गुंतवणुक करु शकता. सध्या या योजनेवर सरकारकडून 8 टक्के व्याज देण्यात येते. 

6/7

नेशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

Top 5 Government Scheme For Women  know about it

महिलांसाठीही ही योजना अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये किमान रु. 1000 ते त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करता येईल. या ठेवीवर ७.७ टक्के व्याज दिले जाते. गुंतवणूकदार पाच वर्षांच्या कालावधीसाठी यामध्ये गुंतवणूक करू शकतात.

7/7

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट स्कीम

Top 5 Government Scheme For Women  know about it

पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट स्कीममध्येही पैसे गुंतवू शकता. यावर सरकार 7.5 टक्के दराने व्याज मिळत आहे. या योजनेत तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागेल.