राज्याच्या अर्थसंकल्पातील Top 10 घोषणा; पेट्रोल - डिझेलपासून 'या' योजनांसाठी निधी

Maharashtra Budget 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीवस सरकारने मोठ्या घोषणांचा पाऊस पाडलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्यांपासून, महिला आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या आहेत पाहूयात. 

| Jun 28, 2024, 16:12 PM IST
1/10

माझी लाडकी बहीण ही योजना सुरु करत असल्याची घोषणा केली. याअंतर्गत महिलांना दीड हजार दरमहा दिले जाणार आहेत. यासाठी 46 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.

2/10

प्रत्येकी वारीला 20 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.⁠मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

3/10

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना राबवली जाणार आहे. याअंतर्गत वर्षाला एका कुटुंबाला 3 सिलेंडर मोफत दिले जातील. बचत गटाच्या निधीत 15 हजारांहून 30 हजार निधी देण्यात येईल. यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे.

4/10

विद्यार्थ्यांना शासनाकडून दरमहा 10 हजार रुपये विद्या वेतन देण्यात येईल. त्यासाठी दरवर्षी 10 हजार कोटींची तरतूद करण्यात येईल. त्यासाठी दरवर्षी 50 हजार युवकांना कार्यप्रशिक्षण दिलं जाणार आहे. 

5/10

कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर पाच हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. गाई दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान 1 जुलैपासून देण्यात येणार आहे.

6/10

शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी मोफत यासाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप या योजनेच्या करता आठ लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे त्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना मोफत वीज व्हावीसाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप देण्यात येईल. या योजने करता 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्यात येणार आहे.

7/10

आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब 1 लाख 50 हजार रुपयांवरून 5 लाख रुपये – एक हजार 900 रुग्णालयांमार्फत एक हजार 356 प्रकारचे उपचार उपलब्ध ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ 347 ठिकाणी कार्यान्वित करणार आहेत. 

8/10

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गिरणी कामगारांना 12 हजार 954 सदनिका वितरित-उर्वरित सदनिका उपलब्ध करुन देण्याचे नियोजन

9/10

सिंधुदुर्ग येथे 66 कोटींच्या आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा डायव्हिंग केंद्राची निर्मिती करणार आहे

10/10

मुंबई, ठाणे , नवी मुंबईतील पेट्रोल आणि डिझेलवरील विक्री करात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यामुळं पेट्रोलच्या दरात 65 पैसे कमी होतील. तर डिझेलच्या दरात 2 रुपयांची कपात होणार आहे.