रोज 20 लाख रुपये कमावणारा खेळाडू वापरतो स्क्रीन फुटलेला Mobile; कारण वाचून वाटेल अभिमान

This Player Use Broke Screen Mobile Know Reason: त्याच्याच संघाने सोशल मीडियावर सामन्यासाठी जातानाचा त्याचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये त्याच्या हातात स्क्रीन फुटलेला फोन दिसत आहे. याच फोनबद्दल त्याला पत्रकारांनी विचारलं असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून सर्वजण थक्क झाल्याचं पाहायला मिळालं. कोण आहे हा खेळाडू आणि त्याने यामागे काय कारण सांगितलं जाणून घेऊयात...

| Jun 28, 2024, 15:24 PM IST
1/15

sadio mane broken phone

पश्चिम आफ्रिकेमधील सेनेगल या छोट्याश्या देशातील प्रसिद्ध फुटबॉलपटू सादियो माने (Sadio Mane) याचा फोटो सोशल मीडियावर वारंवार व्हायरल होत असतो. याच फोटोची सध्या सोशल मीडियावर पुन्हा चर्चा आहे.  

2/15

sadio mane broken phone

या व्हायरल फोटोमध्ये सादियो मानेच्या हातात एक स्क्रीन फुटलेला स्मार्टफोन दिसत आहे. डिसेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा हा फोटो समोर आला तेव्हा तो प्रचंड व्हायरल झाला होता.  

3/15

sadio mane broken phone

या फोटोसंदर्भात एका मुलाखतीत सादियोकडे तुटलेला फोन वापरण्यामागील कारण विचारण्यात आलेलं. त्यावर फारच रंजक आणि अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारं उत्तर दिलं होतं.  

4/15

sadio mane broken phone

सादियो हा लिव्हरपूल या फुटबॉल क्लबसाठी खेळायचा तेव्हाचा हा फोटो आहे. लिसेस्टर सिटीविरुद्धच्या सामन्यासाठी जात असतानाच सादियोचा हा फोटो क्लिक करण्यात आला होता.  

5/15

sadio mane broken phone

सामन्याच्या आधी लिव्हरपूलच्या अकाऊंटवरुन अनेक खेळाडूंचे फोटो शेअर करण्यात आलेले त्यामध्ये सादियोचा हा हातात स्क्रीन फुटलेला स्मार्टफोन घेऊन चालतानाचा फोटोही होता.  

6/15

sadio mane broken phone

हा फोटो चर्चेत आल्यानंतर एका मुलाखतीत सादियोला या स्क्रीन फुटलेल्या स्मार्टफोनबद्दल आणि फोटोबद्दल विचारण्यात आलं. तू हा फुटलेला फोन का स्वत:कडे ठेवला आहेस? त्या व्हायरल फोटोबद्दल काय सांगशील? असं सादियोला विचारण्यात आलं. त्यावर सादियोने, "मी गरीबी फार जवळून पाहिले आहे. त्यामुळेच मी माझा हाच फोन नेहमी दुरुस्त करुन आणतो" असं म्हटलं होतं.  

7/15

sadio mane broken phone

"मी अनेक मोबाईल विकत घेऊ शकतो. मात्र मला असा दिखावा करायचा नाहीये. मला मी कमवलेला पैसा माझ्या लोकांमध्ये वाटायचा आहे," असं सादियो म्हणाला होता.  

8/15

sadio mane broken phone

"मी असे हजारो फोन, 10 फेरारी, 2 जेट प्लेन, हिरेजडीत घड्याळं विकत घेऊ शकतो. पण मला या साऱ्याची खरंच काही गरज आहे का?" असा सवाल त्याने विचारला.  

9/15

sadio mane broken phone

सादियो हा सेनेगल या गरीब देशातील आलेला खेळाडू आहे. घरची आर्थिक परिस्थिती एवढी हालाखीची होती की इच्छा असूनही सादियोला शालेय शिक्षण घेता आलं नाही.  

10/15

sadio mane broken phone

आता सादियोने आपल्या देशामध्ये अनेक शाळा आणि फुटबॉलची मैदानं उभारण्यासाठी सढळ हस्ते आर्थिक मदत केली आहे.  

11/15

sadio mane broken phone

"मी एवढी गरिबी पाहिली आहे की पैसे नसल्याने मला शिक्षणही घेता आलं नाही. आता मी शाळा बांधल्यात जिथे मुलं शिक्षण घेतात. माझ्याकडे बूटही नव्हते. मी बूट न घालता खेळलोय. माझ्याकडे चांगले कपडेही नव्हते. मला पोषक आहारही मिळथ नव्हता. आज माझ्याकडे इतकं सारं आहे की मला ते सारं माझ्या लोकांमध्ये वाटायचं आहे. दिखाऊपणावर खर्च करण्याची माझी इच्छा नाही," असं सादियोने सांगितलं होतं.  

12/15

sadio mane broken phone

लिव्हरपूलकडून खेळलेल्या सादियोची कमाई किती असा प्रश्न पडला असेल तर भारतीय चलनामध्ये सांगायचे झाल्यास तो दर आठवड्याला 1 कोटी 40 लाख रुपये कमतो असं म्हणता येईल. म्हणजेच त्याची दिवसाची कमाई 20 लाख रुपये इतकी आहे.  

13/15

sadio mane broken phone

सादियो 2022 च्या फुटबॉल सिझनमध्ये जर्मनीच्या बायर्न म्यूनिक क्लबकडून खेळलेला ज्यासाठी त्याला 330 कोटी रुपये देण्यात आले होते.  

14/15

sadio mane broken phone

सादियोला सध्या सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबने करारबद्ध केलं आहे. त्यासाठी या क्लबने 360 कोटी 70 लाख रुपये मोजलेत.  

15/15

sadio mane broken phone

नियमितपणे संपत्ती दान करुन, आर्थिक मदत करुन सध्या सादियोकडे एकूण 264 कोटी 28 लाखांहून अधिक संपत्ती आहे.