Hanuman Temples in Pune : डुल्या, जिलब्या आणि बरंच काही... पुण्यातील मारुती मंदिरांची नावं इतकी विचित्र का?

पुणे तेथे काय उणे! असं कायमच म्हटलं जातं. पुण्याला समृद्ध असा इतिहास आहे. यामध्ये अनेक प्राचीन हुनमान मंदिरे आहेत. या मंदिरांची नावे अतिशक हटके आहेत. जाणून घ्या त्या मागचा इतिहास. 

| Apr 26, 2024, 17:52 PM IST

पुणे शहराला सांस्कृतिक आणि समृद्ध असा इतिहास लाभलेला आहे. या इतिहासात अनेक मंदिरांचा वारसा देखील लपलेला आहे. असं असताना पुण्यातील प्राचीन हनुमान मंदिरांचा धेखील असाच इतिहास आहे. महत्त्वाचं म्हणजे या मारुतीच्या मंदिरांची नावे जगभरात प्रसिद्ध आणि चर्चेचा विषय आहे. या नावांमागची वैशिष्ट्ये काय, जाणून घ्या?

1/9

पत्र्या मारुती

Top 10 Popular Hanuman Temples in Pune

पुण्यात ससून रुग्णालयाचं काम सुरू असताना प्रथमच पुण्यात पत्रे आले. रुग्णालयाचं काम पूर्ण झाल्यावर राहिलेले पत्र्याचे तुकडे या मंदिराला वापरण्यात आले. तेव्हापासून हे मंदिर पत्र्या मारुती म्हणून ओळखलं जातं.

2/9

उंटाड्या मारुती

Top 10 Popular Hanuman Temples in Pune

रास्ता पेठेतील केईएम हॉस्पिटलसमोर पूर्वी पेशव्यांचा उंटांचा काफिला थांबायचा. तिथे नियमित उंटांचा तळ असायचा, या उंटाच्या तळामुळे तिथला मारुती मंदिराला ‘उंटाड्या मारुती’ नावाने ओळखले जाऊ लागले. 

3/9

खरकट्या मारुती

Top 10 Popular Hanuman Temples in Pune

लक्ष्मी रस्त्यावरील तुळशीबागेत पूर्वी दुसऱ्या गावातून दर्शनासाठी आलेले भाविक, शेतकरी मंदिराच्या परिसरात भाकरी खाण्यासाठी बसत. त्यावरून या मारुतीला ‘खरकट्या मारुती’ नाव पडलं.  

4/9

उंबऱ्या मारुती

Top 10 Popular Hanuman Temples in Pune

बुधवार पेठेत असलेल्या या हनुमानाच्या मंदिराला उंबऱ्या मारुती असे म्हणतं. कारण उंबराच्या झाडाखाली हे मंदिर वसलेलं आहे. 

5/9

दुध्या मारुती

Top 10 Popular Hanuman Temples in Pune

शुक्रवार पेठेत ‘दुध्या मारुती’चं मंदिर आहे. पूर्वीच्या वेळी या परिसरात गायी-म्हशींचा गोठा होता. मोठ्या प्रमाणात दूध-तूप उपलब्ध होत असे. आजूबाजूचे देव पाण्याचे न्हायचे, मात्र येथील मारुतीला गवळी दुधाने न्हावू घालायचा, त्यामुळे या मारुतीला ‘दुध्या मारुती’ नाव पडलं.

6/9

जिलब्या मारुती

Top 10 Popular Hanuman Temples in Pune

तुळशीबागेच्या तोंडाशी पूर्वी हलवायांची दुकाने होती. इथे असलेल्या मारुतीजवळ दोन प्रसिद्ध जिलेबीची दुकाने होती. हलवाई या मारुतीला जिलेबीची माळ घालत. त्यामुळे या मारुतीला जिलब्या मारुती नाव पडले. येथील मंदिरात हनुमानाची सुबक संगमरवरी मूर्ती आहे.

7/9

बटाट्या मारुती

Top 10 Popular Hanuman Temples in Pune

 पुण्यातील शनिवार वाडा येथील मैदानात असलेल्या मंदिराला बटाट्या मारुती म्हणतात. पेशव्यांच्या राजवटीत येथे शनिवारी बटाटा-कांद्याचा मोठा बाजार भरत असे. तेव्हापासून हे मंदिर बटाट्या मारुती म्हणून ओळखले जाऊ लागले.

8/9

Top 10 Popular Hanuman Temples in Pune

पुण्यातील भांग्या मारुती मंदिर हे देखील लोकप्रिय आहे.  शनिवार वाड्यापासून श्रीमंत दगडूशेठ गणपतीकडे जाताना उजव्या बाजूला भांग्या मारुतीचे मंदिर आहे.  या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात गांजा विकला जात असल्याचे सांगितले जाते. त्यावरुन हनुमानाच्या या मंदिराला 'भांग्या मारुती' म्हणतात.

9/9

डुल्या मारुती

Top 10 Popular Hanuman Temples in Pune

पुण्याच्या गणेशपेठेतील लक्ष्मी रोडवर डुल्या मारुतीचे मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास साडेतीन शतकांपूर्वीचा आहे.  पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांची अहमदशहा अब्दालीशी लढाई झाली. या लढाईदरम्यान ही हनुमानाची मूर्ती हलायला-डोलायला लागली होती. म्हणून या प्राचीन मंदिराला डुल्या मारुती असं नाव पडलं.