ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा झटका, खासदाराने राज्यसभेतच केली ही घोषणा

Feb 12, 2021, 16:34 PM IST
1/5

बंगालमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शुक्रवारी आणखी एक मोठा धक्का बसला. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे तृणमूल कॉंग्रेसचे (TMC)खासदार दिनेश त्रिवेदी यांनी अचानक राज्यसभेत राजीनामा दिला. राज्यसभेतील सभागृहात त्यांनी राजीनामा जाहीर केला. या दरम्यान त्रिवेदी म्हणाले की, 'मी पक्षात घुटमळत आहे', म्हणूनच मी राज्यसभा सदस्याच्या पदाचा राजीनामा देत आहे.

2/5

विशेष म्हणजे, दिनेश त्रिवेदी तृणमूलमध्ये हिंदी भाषिक म्हणून मोठा चेहरा मानले जातात. गेल्या वर्षी तृणमूलने राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांना वरच्या सभागृहात पाठवले होते. एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांनी अचानक राजीनामा दिला. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या दबावाखाली माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांना २०१२ मध्ये रेल्वेमंत्री पदावरुन राजीनामा द्यावा लागला होता. रेल्वेच्या अर्थसंकल्पात भाडे वाढवण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर लवकरच ममतांनी त्यांना रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी सांगितले होते.

3/5

अलीकडे तृणमूल कॉंग्रेसचे अनेक आमदार, २ मंत्री आणि एक लोकसभेचे खासदार यांनी पक्षातून राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राजीनामा दिल्यानंतर दिनेश त्रिवेदी काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेही लवकरच भाजपमध्ये येऊ शकतात अशी चर्चा आहे.

4/5

महत्त्वाचे म्हणजे या वेळी बंगालमध्ये बाह्यचा मुद्दा खूप चर्चेत आहे. तृणमूल कॉंग्रेस सातत्याने भाजप नेत्यांना टार्गेट करत आहे. अशा परिस्थितीत हिंदी भाषिक वर्ग इथल्या तृणमूलवर संतापला आहे. त्यामुळे दिनेश त्रिवेदी यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.

5/5

ममता बॅनर्जी यांच्यासोबत त्यांचे संबंध मध्यंतरात पुन्हा रुळावर आले. 2014 मध्ये त्यांनी बंगालमधील बैरकपुर सीटवरुन लोकसभेची निवडणूक जिंकली होती. मात्र २० च्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपचे खासदार अर्जुन सिंग यांच्याकडून काही हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. यानंतर त्यांना ममता बॅनर्जी यांनी राज्यसभेवर पाठवले होते.