तिरुपती बालाजीला दरवर्षी होतात 500-600 टन केस अर्पण, इतक्या केसांचं काय केलं जातं? जाणून घ्या...

राजीव कासले | Sep 21, 2024, 13:59 PM IST
1/8

तिरुपती बालाजीला दरवर्षी होतात 500-600 टन केस अर्पण, इतक्या केसांचं काय केलं जातं? जाणून घ्या...

2/8

आंध्र प्रदेशमधलं लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाचा मुद्द देशभराता गाजला आहे. भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूत प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल मिसळलं जात असल्याचं समोर आल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले आहेत.

3/8

तिरुपती बालाजी मंदिर देशातल्या सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. आंध्रप्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील तिरुपतजवळच्या तिरुमला टेकडीवर हे प्रसिद्ध बालाजी मंदिर असून जगभरातून दरवर्षी लाखो भाविक दर्शनाला येत असतात. येणारे भाविक लाखो रुपयांबरोबरच सोनं-चांदीही दान करतात. देशातील श्रीमंत मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे.

4/8

तिरुपती बालाजी मंदिरात भाविकांकडून केस अर्पण करण्याचीही एक प्रथा आहे. केस दान करण्यामागे एक प्राचिन कथा आहे. केस दान केल्यानं त्या व्यक्तीच्या जीवनातील नकारात्मकता दूर होते अशी धारणा आहे. त्यामुळे तिरुपती बालाजीला आलेले भाविक दर्शनानंतर आपेल केस दान करतात.

5/8

तिरुमला तिरुपदी देवस्थानम ट्रस्टच्या वतीने दान करण्यात आलेल्या केसांचा लिलाव करतं.  दरवर्षी जवळपास 500 ते 600 टन केस जमा होतात. एका रिपोर्टनुसार दान केलेल्या केसांच्या लिलावातून ट्रस्टला जवळपास 5 ते 6 कोटींची कमाई होते. 

6/8

दान करण्यात आलेले केस स्वच्छ केले जातात. यासाठी केस उकळवून, धुवूनन वाळवले जातात आणि योग्य तापमानात साठवले जातात. या प्रक्रियेने केस स्वच्छ आणि नीटनेटके राहतात. केसांची विक्री ई-ऑक्शनद्वारे केली जाते. हा ऑनलाईन लिलाव तिरुमला तिरुपती देवस्थानमतर्फे आयोजित केला जातो.

7/8

लिलावाआधी या केसांचं वेगवेगळ्या श्रेणीत वर्गीकरण केलं जातं. त्यानंतर केसांच्या लांबीच्या आधारावर पाच शेणी तयार केल्या जातात. यात 5 इंचापासून ते 31 इंचापर्यंतच्या केसांचा समावेश होतो. 

8/8

तिरुपती बालाजी मंदिरात दान केलेले केस आंतरराष्ट्रीय बाजारात विकले जातात. त्यांचा वापर हेअर विग तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. युरोप, अमेरिका, चीन, आफ्रिका आणि इतरत्र बाजारपेठांमध्ये या केसांना प्रचंड मागणी आहे.