Photo: मुकेश अंबानींचे नवीन खाजगी जेट, किंमत 1000 कोटी, आतून कसे दिसते?

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी Boeing 737 MAX 9 खाजगी जेट खरेदी केलं आहे. देशात असं जेट कोणाकडेच नाही. आतून हे खाजगी जेट कसे दिसते? पाहा फोटो

Soneshwar Patil | Sep 21, 2024, 13:45 PM IST
1/6

Boeing 737 MAX 9

Ambani Bought New Private Jet : मुकेश अंबानी यांनी Boeing 737 MAX 9 खाजगी जेटच्या केबिन आणि आताील भागात अनेक बदल करण्यात आले आहेत. जेटमध्ये बदल केल्यानंतर ते योग्यरित्या कार्य करत आहे की नाही पाहण्यासाठी अनेक वेळा उड्डाण देखील करण्यात आले आहे. 

2/6

सर्वात महागडे खासगी जेट

मुकेश अंबानींच्या या नवीन खाजगी जेटने 27 ऑगस्ट 2024 रोजी बासेल ते दिल्ली शेवटचे उड्डाण केले. या जेटने 6,234 किलोमीटरचे अंतर 9 तासांपेक्षा जास्त कालावधीत कापले. दिल्लीत आल्यानंतर हे खाजगी जेट देशातील सर्वात खास आणि महागडे जेट बनले आहे. 

3/6

खासगी जेटची किंमत

Boeing 737 MAX 9 हे सर्वात महागडे खासगी जेट आहे. हे चालवण्यासाठी 2 शक्तीशाली इंजिन आहेत. हे जेट न थांबता 11,770 किमी पेक्षा जास्त अंतर कापू शकते. या खासगी जेटची किंमत 118.5 दशलक्ष डॉलर्स (990 कोटी रुपये) आहे. मात्र, अंबानी कुटुंबाने या जेटवर 1000 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. 

4/6

10 खाजगी जेट

मुकेश अंबानी यांचे Boeing 737 MAX 9 हे खाजगी जेट खूपच खास आहे. याशिवाय त्यांच्याकडे एकूण 10 खाजगी जेट आहेत.  

5/6

डॉफिन हेलीकॉप्टर

मुकेश अंबानी यांच्याकडे दोन हेलिकॉप्टर आहेत. हे कमी अंतरासाठी वापरले जातात. डॉफिन हेलीकॉप्टर हे कंपनीच्या कामासाठी किंवा इतर ठिकाणी फिरण्यासाठी वापरले जाते. 

6/6

अतिशय आरामदायी जेट

मुकेश अंबानी यांचे खाजगी जेट अतिशय आरामदायी आहे. यामधून 19 जण प्रवास करू शकतात. या जेटच्या खिडक्या सामान्य विमानाच्या खिडक्यांपेक्षा 20 टक्के मोठ्या असतात. त्यामुळे बाहेरचे दृश्य स्पष्टपणे दिसते.