यंदा लाडक्या बाप्पाला द्या हटके मोदकांचा नैवेद्य
बाप्पा येणार म्हटल्यावर खास नैवेद्य तर पाहिजेच ना? यात बाप्पाचे आवडते उकडीचे आणि तळणीचे मोदक तर आलेच पण यावर्षी तुम्ही काही नवीन पद्धतीचे मोदक करून बघू शकता. यामुळे बाप्पा आणि तुमच्या घरातली मंडळी नक्कीच खुश होतील.
1/7
2/7
1. नारळाचे मोदक
गणेश चतुर्थीसाठी सोपी नारळाच्या मोदकांची रेसिपी. फक्त 10 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळात तुम्ही तयार करू शकता. साहित्य : डेसिकेटेड कोकोनट (नारळ), कंडेन्स मिल्क कृती: एका भांड्यात डेसिकेटेड कोकोनट आणि कंडेन्स मिल्क छान एकजीव करून घ्या. त्यात गरज भासल्यास थोडे दूध घालावे. मोदकाच्या मोल्ड हे सारण घालून मोदक तयार करून घ्या. याला डेकोरेट करण्यासाठी तुम्ही मेल्ट केलेल्या चॉकलेटचाही वापर करू शकता. मोदकाचा अर्धा भाग चॉकलेटमध्ये बुडवा किंवा पूर्ण मोदकही तुम्ही चॉकलेटमध्ये बुडवू शकता. मोदक सेट फ्रीजमध्ये ठेवा.
3/7
2. ड्रायफ्रुट मोदक
सोपे ड्रायफ्रुटपासून तयार केलेल पौष्टिक मोदक खूप झटपट तयार होतात. साहित्य : मूठभर बदाम, मनुका, खजूर, कोरडे खोबरे, अक्रोड, तूप कृती : बदाम, काजू आणि अक्रोड मिक्सरमधून बारिक करून घ्या. त्यानंतर खजूराच्या बिया काढून खजूर आणि मनुकाही बारिक करून घ्या. इच्छेनुसार त्यात बारिक सुके खोबरे घाला. आता तूप घाला. मिश्रण खूप घट्ट असल्यास तुम्ही थोडे पाणी घालू शकता. हे मिश्रण एकत्र करून घ्या. तूप वापरून मोल्ड ग्रीस करा आणि मोदकाचा आकार द्या. थोड्याच वेळात मोदक तयार होतील.
4/7
3. तिळाचे मोदक
तिळाचे मोदक फक्त 4 घटकांपासून बनवले जातात. याची चव अगदी चिक्कीसारखी चवीष्ट लागते. साहित्य : तीळ, गूळ, तूप, दूध कृती: तीळ एका कढईत मध्यम-मंद आचेवर 3-4 मिनिटे भाजून घ्या. नंतर एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्या. मग बारीक वाटून घ्या. आता एका कढईत तूप आणि गूळ मध्यम आचेवर वितळवून घ्या. ते वितळताच त्यात बारीक केलेल तीळ घाला. पटकन एकत्र करून गॅस बंद करा. हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढा आणि हात लावता येईल एवढेच थंड होऊ द्या. याचा गोळा तयार होत नसेल तर गरजे पुरते दूध घाला. मोदक साच्याला तूप वापरून ग्रीस करा आणि आकार द्या. साचा जवळ ठेवा, स्टफिंग सुरू करा आणि तळाच्या छिद्रातून घट्ट दाबा. तळाची पृष्ठभाग गुळगुळीत करा, उघडा आणि काळजीपूर्वक अनमोल्ड करा.
5/7
4. चॉकलेट मोदक
गणेश चतुर्थीसाठी सर्वात सोपी चॉकलेट मोदकाची रेसिपी! पारंपारिक वाफवलेले मोदकापेक्षा हा मोदक झटपट बनवून तयार होतो. साहित्य : बिस्किट, चॉकलेट चिप्स, कंडेन्स मिल्क, दूध, पिस्ता कृती : एका पॅनमध्ये दूध, कंडेन्स्ड मिल्क आणि चॉकलेट चिप्स मध्यम-मंद आचेवर वितळवून एकत्र करून घ्या. चिटकू नये म्हणून सारखे ढवळत रहा. आता यात बिस्किटाचा चुरा करून घाला. आणि बारिक चिरलेला पिस्ता घालून मिश्रण एकत्र करा. ते एका प्लेटमध्ये काढा आणि थोडे थंड होऊ द्या. तूप वापरून मोदकाच्या साच्याला ग्रीस करा आणि मोदक तयार करून घ्या.
6/7
5. रवा मोदक
झटपट तयार करा चविष्ट रवा मोदक. साहित्य : रवा, दूध, तूप, गूळ, काजू, खोबरं, बेदाणे वेलची पावडर आणि खसखस कृती : एका पातेल्यात मध्यम आचेवर खोबरे आणि गूळ मिक्स करून शिजवा. ते घट्ट होईपर्यंत शिजवणे सुरू ठेवा. याला 6-7 मिनिटे लागतील. आता त्यात खसखस, काजू, बेदाणे आणि वेलची पूड घाला. मिक्स करून एक मिनिट शिजवा आणि गॅस बंद करा. स्टफिंग एका प्लेटमध्ये काढा आणि थंड होऊ द्या. कढईत रवा घ्या आणि त्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत सतत ढवळत भाजून घ्या. याला 7-8 मिनिटे लागतीत. नंतर प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा. एका पातेल्यात पाणी आणि दूध घ्या. तूप घालून गॅस मध्यम करा आणि मिश्रणाला उकळी येऊ द्या. यात भाजलेला रवा घाला. काही मिनिटांत मिश्रण घट्ट होईल. हात लावता येईल एवढे थंड झाल्यावर मिश्रण मळून घ्या. मोदकाच्या साच्याला तूप वापरून ग्रीस करा. पिठाचा एक छोटा गोळा घ्या आणि तळाच्या छिद्रातून साच्यात घाला. आपल्या बोटाचा वापर करून, ते कडाभोवती घट्ट दाबा आणि एक पोकळ तयार करून घ्या. मध्यभागी तयार केलेले स्टफिंग भरा. आता तळाचा भाग थोडासा रव्याच्या कणकेने बंद करा आणि गुळगुळीत करा. साचा आता काळजीपूर्वक उघडा. मोदक तयार.
7/7