6 लाखांच्या आत मिळतेय ही दमदार SUV; फिचर्स, स्पेसिफिकेशन्स पाहून Booking कराल विचार

Best Micro SUV In India Under 6 Lakh Budget: कोणत्याही चांगल्या दर्जाच्या आणि उत्तम परफॉरमन्स देणाऱ्या एसयूव्हीसाठी किमान 10 लाख मोजण्याची तयारी ठेवावी लागते. मात्र ज्या लोकांना 6 लाखांपर्यंत कार घ्यायची आहे आणि त्यांना एसयूव्ही आवडते अशा लोकांसाठी एक खास कार बाजारात उपलब्ध आहे. याच कारबद्दल जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Jan 04, 2024, 15:14 PM IST
1/12

best micro suv in indian market under 6 lakh budget

भारतात कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारची क्रेझ दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र एसयूव्हींची किंमत अधिक असल्याने कर्ज घेऊन अशा गाड्या घेताना अनेकजण ईएमआय आणि एकंतरित तडजोडीचं गणित लक्षात घेत आपला एसयुव्हीचा मोह टाळतात.

2/12

best micro suv in indian market under 6 lakh budget

सामान्यपणे कोणत्याही मोठ्या आकाराची एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार केला तर किमान 10 लाख रुपये मोजावे लागतात. मात्र एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही चक्क 6 लाखांमध्ये उपलब्ध आहे.

3/12

best micro suv in indian market under 6 lakh budget

एसयूव्हीची आवड असलेल्या मात्र बजेट 6 लाखांपर्यंत असलेल्यांसाठी देशातील आघाडीच्या कार निर्मिती कंपनीने खास मायक्रो एसयूव्ही बाजारात आणली आहे. 

4/12

best micro suv in indian market under 6 lakh budget

देशातील अनेक ग्राहक बजेट फ्रेण्डली एसयूव्ही म्हणून या गाडीला पसंती देताना दिसत आहे. किंमतीबरोबरच एका मोठ्या एसयूव्हीमधील सर्व फिचर्स या कारमध्ये आहेत. तुम्ही सुद्धा 6 लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे फिचर्स शोधत असाल तर टाटा पंचचा विचार करु शकता.

5/12

best micro suv in indian market under 6 lakh budget

उत्तम बिल्ट क्लॉलिटीमुळे टाटा पंच ही ग्राहकांमध्ये छोटी नेक्सॉन म्हणून लोकप्रीय आहे.

6/12

best micro suv in indian market under 6 lakh budget

बोल्ड लूक्सबरोबरच मायक्रो एसयूव्ही रोड प्रेझेन्समध्येही अनेक गाड्यांना सहज मागे टाकते. टाटा पंचचा लूक, फिचर्स, बजेट आणि मायलेजमध्ये टाटा पंच किती उत्तम आहे हे जाणून घेऊयात. 

7/12

best micro suv in indian market under 6 lakh budget

टाटा पंचमध्ये हरमन किंवा इन्फोटेन्मेंट सिस्टीम, डिजिटल इन्स्टूमेंट क्लस्टर, लेदर रॅप्ड फ्लॅट बॉटम स्टेअरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल, सिटी आणि ईको ड्राइव्ह मोड, हाइट अॅडजेस्टेबल सीटसहीत अनेक फिचर्स आहेत.

8/12

best micro suv in indian market under 6 lakh budget

सेफ्टीबद्दल बोलायचं झालं तर टाटा पंचमध्ये 2 एअर बॅग्स, स्पीट सेन्सिंग डोअर लॉक्स, चाइल्ड लॉक, एबीएस, ईबीडी, रेअर पार्किंग सेन्सरसारख्या गोष्टींचा समावेश आहे.

9/12

best micro suv in indian market under 6 lakh budget

टाटा पंचमध्ये 1.2 लीटरचं नॅचरली एस्पिरेटेड 3 सिलेंडर रेवेट्रॉन इंजिन आहे. या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युएल किंवा ऑटोमॅटिक गेअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे.

10/12

best micro suv in indian market under 6 lakh budget

कंपनीने केलेल्या दाव्यानुसार या इंजिनसहीत टाटा पंच 20 किलोमीटर प्रति लीटरचा मायलेज देते. गाडीचं सीएनजी व्हर्जन 30 किलोमीटर प्रति किलो मायलेज देते.

11/12

best micro suv in indian market under 6 lakh budget

टाटा पंचच्या बेसिक मॉडेलची किंमत 6 लाख रुपयांपासून (एक्स शोरुम प्राइज) सुरु होते.

12/12

best micro suv in indian market under 6 lakh budget

टाटा पंचच्या टॉप एण्ड मॉडेलची किंमत 10.10 लाख रुपये इतकी आहे. ही गाडी तब्बल 33 व्हेरिएंटमध्ये आणि 9 रंगांमध्ये उपलब्ध आहे. टॉप व्हेरिएंटमध्ये सनरुफही आहे.