मासे नव्हे, तर 'या' शाकाहारी पदार्थांमध्ये असते ओमेगा-3! केस, त्वचा ते हृदयापर्यंत सर्वकाही निरोगी

मासांहारामध्ये विशेषत: मासे खाल्ल्यावरच ओमेगा 3 मिळते असा अनेकांचा समज असतो. पण असे नाही.

Pravin Dabholkar | Mar 04, 2024, 16:04 PM IST

Vegetarian Foods High in Omega 3: मासांहारामध्ये विशेषत: मासे खाल्ल्यावरच ओमेगा 3 मिळते असा अनेकांचा समज असतो. पण असे नाही.

1/8

मासे नव्हे, तर 'या' शाकाहारी पदार्थांमध्ये ओमेगा-3! केस, त्वचा ते हृदयापर्यंत सर्वकाही निरोगी

Vegetarian Foods are High in omega 3 Health Tips

Vegetarian Foods High in Omega 3: आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा-3 फॅटी ॲसिड आवश्यक असते. हे एक फॅटी ऍसिड आहे जे केसांपासून त्वचा आणि हृदयापर्यंत सर्व काही निरोगी ठेवण्यास मदत करते. ओमेगा-3 फॅटी ऍसिडमुळे शरीरातील जळजळ कमी होते.याशिवाय वयानुसार विस्मरण आणि स्मृतिभ्रंशाचा धोकाही कमी होतो.

2/8

शाकाहारातून मिळेल ओमेगा 3

Vegetarian Foods are High in omega 3 Health Tips

आहारात ओमेगा-3 समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करून त्याची कमतरता भरून काढली जाऊ शकते. दरम्यान मासांहारामध्ये विशेषत: मासे खाल्ल्यावरच ओमेगा 3 मिळते असा अनेकांचा समज असतो.

3/8

आहारात 5 गोष्टींचा समावेश

Vegetarian Foods are High in omega 3 Health Tips

पण असे काही नाही. शाकाहारी लोक त्यांच्या आहारात पुढे देण्यात आलेल्या 5 गोष्टींचा समावेश करून ओमेगा-3 ची कमतरता भरुन काढू शकतात. ओमेगा -3 फॅटी अॅसिड असणारे शाकाहारी पदार्थ जाणून घेऊया. 

4/8

अक्रोड

Vegetarian Foods are High in omega 3 Health Tips

अक्रोडाचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड असते. ज्यामुळे तुमचे हृदयही निरोगी राहते. अक्रोड हे खाण्यास स्वादिष्ट असते. याचे फायदेदेखील खूप आहेत. त्यात अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि निरोगी चरबी असते. नाश्त्यात 4 ते 5 अक्रोड खाल्ल्यास ओमेगा 3 ची कमतरता भरून निघू शकते.

5/8

चिया बिया

Vegetarian Foods are High in omega 3 Health Tips

चिया बिया ओमेगा-3 फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत आहेत. चिया बियांमध्ये फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. चिया बिया हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही चिया बिया पाण्यात घालून किंवा सलाड आणि स्मूदीमध्ये मिसळून खाऊ शकता.

6/8

फ्लॅक्स सीड्स

Vegetarian Foods are High in omega 3 Health Tips

शाकाहारी व्यक्तींनी ओमेगा-3 फॅटी ॲसिडसाठी अंबाडीच्या बियांचा आहारात समावेश केला पाहिजे. फ्लॅक्स सीड्समध्ये फायबर आणि लिग्नॅन्स असते. तसेच यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. फ्लॅक्ससीड हृदयासाठी देखील उत्कृष्ट मानले जाते. तुम्ही ते भाजूनही खाऊ शकता.

7/8

सोयाबीन

Vegetarian Foods are High in omega 3 Health Tips

ओमेगा-3 फॅटी ॲसिडसाठी तुमच्या आहारात सोयाबीनचा समावेश करा. सोया उत्पादनांमध्ये ओमेगा 3 असते. यासाठी तुम्ही टोफू, सोया मिल्क किंवा सोया चंक्स खाऊ शकता. सोयाबीनमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि हाडे मजबूत होतात. 

8/8

स्पिर्युलिना

Vegetarian Foods are High in omega 3 Health Tips

हिरवे आणि निळे शैवाल म्हणून ओळखले जाणारे स्पिरुलिना हे ओमेगा-3 फॅटी अॅसिडचा चांगला स्रोत आहे. शाकाहारी व्यक्ती आपल्या आहारात याचा समावेश करू शकतात. यामुळे ऊर्जा वाढते आणि प्रतिकारशक्ती मजबूत होते.