Valentines Day 2024 : घटस्फोटानंतर 'या' कलाकारांना मिळालं प्रेम

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत, ज्यांनी लग्नाच्या काही वर्षांनंतर घटस्फोट घेतला. मात्र, त्यानंतर त्यांना त्यांचं प्रेम मिळालं. त्यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावं आहेत. चला तर जाणून घेऊयात कोण आहेत ते कलाकार ज्यांना घटस्फोटानंतर खरं प्रेम मिळालं. 

| Feb 14, 2024, 18:03 PM IST
1/7

मलायका अरोरा

2017 मध्ये मलायकानं अरबाज खानला घटस्फोट दिला. त्यानंतर ती अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली. 

2/7

हृतिक रोशन

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी 2013 मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर घटस्फोटानंतर त्या दोघांना हृतिक आणि सुझान यांना त्यांचं प्रेम मिळालं. हृतिक हा सबा आझादला डेट करतोय. 

3/7

फरहान अख्तर

फरहान अख्तरनं लग्नाच्या 16 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. तर घटस्फोटानंतर फरहानला शिबानी दांडेकरशी प्रेम झालं. चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी 2022 मध्ये लग्न केलं. 

4/7

सैफ अली खान

सैफनं लग्नाच्या 13 वर्षांनंतर 2004 मध्ये घटस्फोट दिला. सैफ अली खानला त्यानंतर करीना कपूर खानमध्ये प्रेम सापडलं आणि त्या दोघांनी 2012 मध्ये लग्न केलं. 

5/7

अर्जुन रामपाल

अर्जुन रामपालनं मेहर जेसियाशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 20 वर्षांनंतर 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना दोन मुली असून घटस्फोटानंतर अर्जुन साऊथ अफ्रिकाची मॉडेल गॅब्रिएला डिमेट्रेड्ससोबत रिलेशनशिपमध्ये आला. 

6/7

पुलकित सम्राट

पुलकित सम्राटनं 2014 मध्ये सलमानची राखी बहीण श्वेता रोहिराशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 11 महिन्यानंतर ते दोघं विभक्त झाले. त्यानंतर आता पुलकित सम्राटला पुन्हा एकदा प्रेम मिळालं आहे. 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अभिनेत्री क्रिती खरबंदाशी साखरपुडा केला.  

7/7

अरबाज खान

अरबाज खान आणि मलायकानं 1998 मध्ये लग्न केलं. 19 वर्षांच्या सुखीसंसारानंतर ते दोघं विभक्त झाले. त्यानंतर 2023 मध्ये अरबाजनं मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केलं.