महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन स्थळ जे दिवसभरात फक्त 30 मिनिटांसाठी उघड असतं; कोकणातील संगम सिगल बेट

कोकणातील अनोखं ठिकाण जिथं नदी आणि सागराची भेट होते. हे ठिकाण दिवसभरात फक्त 30 मिनिटच सुरु असते. 

| May 13, 2024, 22:09 PM IST

Sangam Seagull island at Devbag Beach : कोकणातील अथांग समुद्र किनारे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. कोकणातील अनेक समुद्र किनारे जितके सुंदर आहेत तितकेच ते वैशिष्ट्यपूर्ण देखील आहेत. असाच एक आहे सिंधुदुर्ग मधील देवबाग समुद्र किनारा. येथे नदी आणि समुद्राचा संगम होतो.

 

1/7

नदी शेवटी समुद्रालाच येवून मिळते. कोकणात असचं एक ठिकाण आहे जिथे जिथं नदी आणि समुद्र एकरुप होतात. दिवसभरात फक्त 30 मिनिट येथे जाता येते.   

2/7

कोकण रेल्वेने कुडाळ स्टेशनला उतरुन येथे जाता येते. मालवण पर्यंत थेट बस देखील आहेत. मालवण येथून बोटीनेच या बेटावर जाता येते. दिवसभरात फक्त 30 मिनिटच येथे फिरता येते. 

3/7

या जमीनीच्या टोकावरुन मंत्रमुग्ध करणारा नजारा पहायला मिळतो.  कोकण म्हणजे खरचं स्वर्ग असा अनुभव येथे येतो.

4/7

येथे जमिनीचे एक निमुळते टोक समुद्र व नदीच्या मिलनाचा दुवा आहे. देवाबाग समुद्र किनारा सिगल संगमसाठी प्रसिद्ध आहे. 

5/7

नदी आणि समुद्राचा संगम होऊन येथे एक सुंदर बेट तयार झाले आहे. संगम सिगल बेट असे या बेटाचे नाव आहे. 

6/7

सिंधुदुर्गमधील देवबाग समुद्र मालवणपासून 12 किलोमीटर अंतरावर तर तारकर्लीपासून सहा किलोमीटरवर आहे.    

7/7

 कर्ली नदी आणि अरबी समुद्रांचा येथे संगम होतो. यामुळेच देवबाग समुद्र किनाऱ्यावर अद्धभूत नजारा पहायला मिळतो.