विकेंडचा आनंद घ्या OTT वर; पाहा हे 7 नवे चित्रपट आणि सीरिज

ओटीटीवर या महिन्यात अनेक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर अनेक चित्रपट आणि सीरिज या ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. आता या आठवड्यात एक-दोन नाही तर 7-7 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात देवरा ते सिटाडेल हनी बनी, विजय 69 सारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चला तर जाणून ओटीटीवर काय प्रदर्शित होणार आहे. 

Diksha Patil | Nov 05, 2024, 19:18 PM IST

ओटीटीवर या महिन्यात अनेक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर अनेक चित्रपट आणि सीरिज या ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. आता या आठवड्यात एक-दोन नाही तर 7-7 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात देवरा ते सिटाडेल हनी बनी, विजय 69 सारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चला तर जाणून ओटीटीवर काय प्रदर्शित होणार आहे. 

1/7

आता घर बसल्या तुम्ही बहुप्रतिक्षीत चित्रपट पाहू शकता. त्यात रजनीकांत यांचा 'वेट्टैयान' ते ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खानचा 'देवरा पार्ट वन' तर आणखी 7 मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चला तर जाणून घेऊया कोणते चित्रपट ओटीटीवर तुम्ही पाहू शकता. 

2/7

वरुण धवन आणि समांथा रुथ प्रभूची 'सिटाडेल : हनी बनी' ही वेब सीरिज 7 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सीरिजच्या हॉलिवूड व्हर्जनमध्ये प्रियांका चोप्रा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 

3/7

'टाइम कट' या अमेरिकेच्या सायन्स फिक्शन चित्रपटात मॅडिसन बेली, एंटोनिया जेंट्री आणि ग्रिफिन ग्लक आहे. आता हा टाइम ट्रॅव्हलवर असणारा चित्रपट 30 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. 

4/7

रजनीकांत यांचा वेट्टैयान हा चित्रपट गेल्या महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात रजनीकांत आणि अमिताभ बच्चन हे एकत्र दिसत आहेत. आता हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉमवर 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

5/7

हंसल मेहता यांचा बकिंघम मर्डर्स हा चित्रपट 8 नोव्हेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या सस्पेंस थ्रिलर चित्रपटात करीना कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉमवर पाहू शकता. 

6/7

या प्रेरणादायी ठरणाऱ्या चित्रपटात अनुपम खेर दिसत आहेत. या चित्रपटाचं नाव विजय 69 आहे. तर हा प्राइम व्हिडीओवर 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

7/7

'देवरा पार्ट 1' हा चित्रपट ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खानचा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.