'वाईल्ड लाईफ लव्हर्स'नं भारतातल्या या ठिकाणांना भेट द्यायलाच हवी

शहरांच्या गजबजाटापेक्षा निसर्ग आणि वाईल्ड लाईफ अनुभवायला ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी हे खास... भारतातल्या या ठिकाणांवर जाऊन तुम्हाला केवळ वाईल्ड लाईफ अनुभवायला मिळणार नाही तर निसर्गाच्या सौंदर्याचा आनंदही तुम्ही घेऊ शकाल.  

Sep 14, 2018, 15:18 PM IST
1/7

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क

उत्तराखंडच्या नैनीताल जिल्हा स्थित जिम कॉर्बेट नॅशनल पार्क नेहमीच वाईल्ड लाईफ लव्हर्सचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलंय. इथं दरवर्षी लाखोंच्या संख्येत देश-विदेशातील टूरिस्ट वाईल्ड लाईफचा अनुभव घेण्यसाठी दाखल होतात. भारतातलं हे सर्वात जुनं नॅशनल पार्क आहे... याची स्थापना 1936 मध्ये करण्यात आली होती. याची स्थापना बंगाल टायगरच्या संरक्षणासाठी हॅली नॅशनल पार्क स्वरुपात करण्यात आली होती. 

2/7

काझीरंगा नॅशनल पार्क

काझीरंगा नॅशनल पार्क

एकशिंगी गेंडा पाहायचा असेल तर तो तुम्हाला केवळ काझीरंगा नॅशनल पार्कमध्येच पाहायला मिळेल. युनेस्कोच्या जागतिक वारसात समाविष्ठ असलेलं हे पार्क वाईल्ड लाईफ सेन्चुरीच्या स्वरुपात भारतातील उल्लेखनीय ठिकाण आहे. ग  

3/7

सुंदरबन नॅशनल पार्क

सुंदरबन नॅशनल पार्क

सुंदरबन भारतातील सर्वात मोठं टायगर रिझर्व्ह पार्क तर आहेच परंतु, हे सर्वात मोठं नॅशनल पार्कही ठरलंय. गंगा नदीच्या डेल्टा क्षेत्रात सुंदरबन बंगाल वाघांसाठी ओळखलं जातं. वर्षभर प्रवासी पक्ष्यांचं घरही इथं दिसतात. पावसाळ्यात तर 'सुंदरबन' हे आपल्या नावाला सार्थक ठरेल इतकं आकर्षक दिसतं. इथं भेट देण्यासाठी पावसाळा बेस्ट सिझन ठरतो.  

4/7

कान्हा नॅशनल पार्क

कान्हा नॅशनल पार्क

मध्यप्रदेशच्या जबलपूरहून केवळ 175 किलोमीटर दूर स्थित कान्हा नॅशनल पार्कला वर्षभरात कधीही तुम्ही भेट देऊ शकता... परंतु, थंडीच्या दिवसांत मात्र या उद्यानाची सुंदरता न्याहाळण्यासारखी असते. चित्ता, वाघ, पक्ष्यांशिवाय प्रवासी पक्ष्यांचीही संख्या इथं भरपूर दिसते  

5/7

रणथंबोर अभयारण्य

रणथंबोर अभयारण्य

उत्तर भारतातील सर्वात मोठ्या जंगलांपैंकी एक रणथंबोर नॅशनल पार्क रॉयल बंगाल टायगरसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या जंगलाच्या मध्यभागी एक दमदार किल्लाही आहे... त्यामुळे या परिसराची शोभा आणखीनच वाढते. रणथंबोर जयपूरहून 130 किलोमीटर दूर आहे.  

6/7

गिर नॅशनल पार्क

गिर नॅशनल पार्क

भारतीय सिहांसाठी आपली ओळख असलेला गिर नॅशनल पार्क वाईल्ड लाईफ प्रेमींनी एकदा तरी पाहावंच, असं आहे. गिर नॅशनल पार्कमध्ये कोणत्याही वेळेत आणि कुठेही अगदी सहजच सिंह पाहायला मिळतात. उल्लेखनीय म्हणजे, आशियाई सिहांसाठी हे जगातील एकमेव जंगल आहे. 

7/7

नागरहोल नॅशनल पार्क

नागरहोल नॅशनल पार्क

रंगीबेरंगी पक्षी आणि आशियाई हत्ती ही या नागरहोल नॅशनल पार्कची खासियत... मैसूरच्या राजांसाठी हे एकेकाळी शिकारीचं ठिकाण होतं... परंतु, आता मात्र हे जगातल्या वाईल्ड लाईफ प्रेमींसाठी आकर्षणाचं ठिकाण बनलंय.