इथे मिळेल तुम्हाला नवीन आयफोन, प्री ऑर्डर करा बुक

तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅप्पलनं आयफोनचं नवीन मॉडेल आणि स्मार्टवॉच बाजारात उतरवलंय. शिवाय प्रगत 'आयओएस 12' 17 सप्टेंबरपासून युझर्ससाठी उपलब्ध करून देणार असल्याचं म्हटलंय. 

Sep 14, 2018, 14:59 PM IST
1/5

प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध

प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध

आयफोन एक्स एस आणि आयफोन एक्स एस मॅक्स 14 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असतील... तर ते 21 सप्टेंबरपासून स्टोअरवर उपलब्ध होतील. चेन्नईच्या 'रेडिंग्टन' सप्लाय चेन कंपनीनं एका जाहिरातीद्वारे कंपनी देशातील आपल्या 2,500 रिटेल आऊटलेटद्वारे हे मोबाईल विकणार असल्याचं म्हटलंय. 

2/5

नवं ऑपरेटिंग सिस्टम

नवं ऑपरेटिंग सिस्टम

सोबतच, नव्या ऑपरेटिंग सिस्टमचं अपडेट व्हर्जन 17 सप्टेंबरपासून उपलब्ध होणार असल्याचं अॅप्पलनं म्हटलंय. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, याद्वारे युझर्स अधिक वेगात टाईप करू शकतील तसंच एकापेक्षा अधिक अॅपवरही काम करू शकतील. 

3/5

ओएस अपडेट

ओएस अपडेट

हे अपडेट आयफोन 5 एस आणि त्यानंतरच्या सर्व मॉडल, आयपॅड मिनी 2 आणि त्यानंतरच्या मॉडल तसंच आयपॉडसाठी उपलब्ध असेल  

4/5

नवीन आयफोनचे फिचर्स

नवीन आयफोनचे फिचर्स

आयफोन एक्स एसमध्ये 5.8 इंचा आणि आयफोन एक्स एस मॅक्समध्ये 6.5 इंचाचा सुपर रेटिना डिस्प्ले देण्यात आलाय. सोबतच दोन्हींत फास्ट आणि ड्युएल कॅमेरा देण्यात आलाय. तर आयफोन एक्स आरचं मॉडेल 64 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबी मध्ये सफेद, काळ्या, निळ्या आणि लाल रंगात उपलब्ध असेल.   

5/5

नवीन आयफोनची किंमत

नवीन आयफोनची किंमत

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, आयफोनची किंमत 750 डॉलर, 1000 डॉलर आणि 1100 डॉलरपासून सुरू होईल.