27 वर्षांनी मोठे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात पडली 'ही' अभिनेत्री, गुपचूप लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर उडाली होती खळबळ

प्रसिद्ध अभिनेत्री 27 वर्षांनी मोठे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात पडली. गुपचूप लग्न केल्याने देशभरात उडाली होती खळबळ. जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Sep 28, 2024, 17:54 PM IST
1/6

प्रसिद्ध अभिनेत्री

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राधिका कुमारस्वामी. अभिनेत्रीसोबतच ती एक फिल्ममेकर देखील आहे. 

2/6

मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात

सध्या राधिका कुमारस्वामी तिच्या चित्रपटांपेक्षा कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांसोबतच्या अफेअरमुळे जास्त चर्चेत आहे. 

3/6

एचडी कुमारस्वामी

अभिनेत्रीने 2006 मध्ये कर्नाटकचे राजकीय नेते एचडी कुमारस्वामी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने देशभरात खळबळ उडाली होती.

4/6

करिअर उद्ध्वस्त

राधिकाच्या लग्नानंतर तिचे करिअर उद्ध्वस्त झाले. एचडी कुमारस्वामी यांच्या राजकीय प्रवासापेक्षा त्यांच्या वैयक्तिक जीवनाची जास्त चर्चा होत आहे.  

5/6

दुसरी पत्नी

अभिनेत्रीने लग्न केले तेव्हा एचडी कुमारस्वामी हे 47 वर्षांचे होते. तर राधिका त्यांच्यापेक्षा 27 वर्षांनी लहान होती. राधिका त्यांची दुसरी पत्नी होती. 

6/6

गुपचूप लग्न

राधिका आणि एचडी कुमारस्वामी यांनी गुपचूप लग्न केले होते. आता दोघांनाही एक मुलगी आहे. तिचं नाव शमिका आहे.