बॉलिवूडचा तो फ्लॉप चित्रपट, जो पुन्हा प्रदर्शित होताच ठरला ब्लॉकबस्टर, 'शोले'चा देखील मोडला रेकॉर्ड

2018 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर ठरला होता फ्लॉप. मात्र, 2024 मध्ये पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर. जाणून घ्या सविस्तर  

| Sep 28, 2024, 16:19 PM IST
1/7

फ्लॉप चित्रपट

बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत. जे पहिल्यांदा प्रदर्शित झाल्यानंतर फ्लॉप ठरले. मात्र, हेच चित्रपट जेव्हा टीव्हीवर आले. तेव्हा ते प्रेक्षकांनी खूप वेळा पाहिले. 

2/7

पुन्हा प्रदर्शित

असाच एक चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र, 2024 मध्ये पुन्हा प्रदर्शित केल्यानंतर हा चित्रपटाने 'शोले' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. 

3/7

ब्लॉकबस्टर

आम्ही तुम्हाला 'तुंबाड' चित्रपटाबद्दल सांगत आहोत. जो पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर ब्लॉकबस्टर ठरला. ज्याने सर्वाधिक कमाई केली. 

4/7

चित्रपटाची कमाई

'तुंबाड' चित्रपट 13 सप्टेंबरला पुन्हा प्रदर्शित झाला. या चित्रपटाने 10 दिवसांमध्ये 22.63 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने सुरुवातीच्या टप्प्यात 12.50 कोटींची कमाई केली. पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचे कलेक्शन 34 कोटी झाले आहे. 

5/7

सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

भारतात 'तुंबाड' चित्रपटाने एकूण कलेक्शन 36.60 कोटी रुपये आहे. 2000 नंतर भारतात पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 

6/7

2018 मध्ये 'तुंबाड' फ्लॉप

 'तुंबाड'ने पुन्हा प्रदर्शित झालेल्या 'शोले' ( 13 कोटी ) आणि 'लैला मजनू' (11.50 कोटी) या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे. 

7/7

'तुंबाड 2'ची घोषणा

सोहम शाह यांचा 'तुंबाड' हा चित्रपट 6 वर्षांनंतर थिएटरमध्ये परतला. त्यावेळी त्यांनी 'तुंबाड 2' ची अधिकृत घोषणा करून चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे.