PHOTO : 'या' चटकदार चटण्या जेवणाची चवच नव्हे, शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढवणार

Chutney Health Benefits in Marathi : ताटात चटकदार चटण्या नसल्यास जेवण्याची मजाच नाही. या स्वादिष्ट, गोड आंबट आणि तिखट अशी ही चटण्या फक्त जिभेचे चोचले पुरवत नाही तर त्यांच्यापासून आपल्या आरोग्यास वेगवेगळे फायदे होतात. 

Mar 05, 2024, 12:24 PM IST
1/7

शेंगदाण्याची चटणी

शेंगदाण्याच्या चटणीत भरपूर प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात. या चटणीमुळे हृदयाच्या आरोग्यास मदत होते. त्याशिवाय वजन नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

2/7

तिळाची चटणी

तिळाची चटणीमुळे आपल्याला कॅल्शियम, लोह, अँटिऑक्सिडंट मिळतो. हाडांच्या आरोग्यास फायदा होता. त्याशिवाय शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत मिळते. 

3/7

फ्लॅक्स सीड चटणी

या चटणीपासून ओमेगा - 3 फॅटी एॅडिस आणि फायबर मिळतं. या चटणीच्या सेवनामुळे पाचन क्षमता वाढते. जळजळ कमी करण्यास मदत मिळते. 

4/7

सोयाबीन चटणी

या चटणीमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे आपल्याला मिळतात. तर या चटणीच्या सेवनाने स्नायूंच्या वाढीस मदत मिळते. कोलेस्टोरॉलची पातळी सुधारण्यास मदत होते. 

5/7

लसूण खोबऱ्याची चटणी

या चटणीमध्ये अँटीव्हायरल, फायबर, ब आणि क जीवनसत्त्वे असतं. तर यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि पाचन सुधारण्यास मदत मिळते. 

6/7

कढीपत्त्याची चटणी

अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे मिळतात. ही चटणी केसांच्या वाढीस आणि दृष्टी सुधारण्यास मदत मिळते. 

7/7

कारळ्याची चटणी

या चटणीमध्ये प्रथिने, फायबर आणि पोषणतत्त्वे असल्याने मेंदूच्या आरोग्यास फायदा मिळतो. त्याशिवाय या चटणीच्या सेवनाने वजन कमी करण्यास मदत मिळते.