कल्याणवरून नवी मुंबई अवघ्या काही मिनिटांत? पाहा नव्या मेट्रो मार्गामुळं तुम्हालाही होणार फायदा

Kalyan To Taloja Metro Route : मागील काही वर्षांमध्ये मेट्रो, मोने, रेल्वे आणि रस्ते मार्गामध्ये झालेल्या अविश्वसनीय प्रगतीमुळं शहरातील प्रवासाची व्याख्या बदलली आहे.   

Mar 05, 2024, 09:15 AM IST

Kalyan To Taloja Metro Route : प्रवास मार्गांमध्ये होणाऱ्या बदलांचा थेट फायदा नागरिकांना होताना दिसत आहे. अशा या प्रवास मार्गांमध्ये आता आणखी एक नवी वाट जोडली जाणार असून ही वाट कल्याण आणि नवी मुंबईली आणखी जवळ आणणार आहे. 

1/7

नवी मुंबईला कल्याणशी जोडणार हा मार्ग

Kalyan taloja metro to be operational till 2027 know latest update

Kalyan To Taloja Metro Route : पुढील काही वर्षांमध्ये मेट्रोचा आणखी एक मार्ग नवी मुंबईला कल्याणशी जोडणार आहे. उपलब्ध माहितीनुसार मेट्रो 12 च्या मार्गिकेचं हे काम 2027 अखेर पूर्ण होण्याचे संकेत आहेत. 

2/7

एकंदर मेट्रोचा वर्तुळाकार मार्ग

Kalyan taloja metro to be operational till 2027 know latest update

मेट्रोचा हा नवा मार्ग पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल झाल्यास अंधेरी-मीरा-भाईंदर-वडाळा-घाटकोपर-ठाणे-कल्याण-नवी मुंबई असा एकंदर मेट्रोचा वर्तुळाकार मार्ग शहरात सुरू होणार आहे. 

3/7

नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे शहर जोडलं जाणार

Kalyan taloja metro to be operational till 2027 know latest update

महत्त्वाची बाब म्हणजे मेट्रो 12 ला मेट्रो 3,4,5 सह अन्य काही मेट्रो मार्गांशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे शहर मेट्रोने सहजगत्या जोडलं जाईल.  

4/7

भूमिपूजन

Kalyan taloja metro to be operational till 2027 know latest update

या नव्या मार्गासाठीच्या मेट्रो मार्गाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला.  ज्यानंतर ‘एमएमआरडीए’ने प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. 

5/7

लाखो प्रवाशांना फायदा

Kalyan taloja metro to be operational till 2027 know latest update

मेट्रोचा हा नवा मार्ग सेवेत दाखल झाल्यास दर दिवशी अंदाजे अडीच लाख प्रवासी इथून ये-जा करतील अशी अपेक्षा एमएमआरडीएनं व्यक्त केली आहे. 

6/7

प्रवासमार्ग

Kalyan taloja metro to be operational till 2027 know latest update

दरम्यान, शहरातील 337 किमी अंतराच्या मेट्रो प्रकल्पातील कल्याण-तळोजा मेट्रो 12 हा मार्ग 20.75 किमी लांबीचा आहे. 

7/7

मेट्रो स्थानकं

Kalyan taloja metro to be operational till 2027 know latest update

कल्याण, एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसावली गाव, गोलावली, डोंबिवली एमआयडीसी, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकळण, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा या 19 मेट्रो स्थानकांचा यात समावेश आहे.