टॉयलेट फ्लशच्या दुसऱ्या बटणाचा नेमका काय उपयोग असतो? वापरल्यास होईल फायदा

Dual Flush Toilet : टॉयलेट वापरताना तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल फ्लश टॅंकला दोन बटण असतात. यातील एक बटण हे आकाराने मोठं तर दुसरं बटण हे आकाराने लहान असतं. या दोन बटणाचा वापर नेमका कशासाठी केला जातो याविषयी जाणून घेऊयात. 

| Jan 06, 2025, 19:52 PM IST
1/7

पाण्याची बचत करण्यासाठी आणि त्याचा अपव्यय टाळण्यासाठी शौचालयांमध्ये ड्युअल फ्लश बसविण्यास सुरुवात करण्यात आली. तर टॉयलेटमध्ये लागलेले मोठे फ्लश हे केवळ टॉयलेटमधील मल बाहेर काढण्यासाठी वापरले जाते.  

2/7

फ्लश टॅंकला असलेले फ्लशचे मोठे बटण प्रेस केल्यावर सुमारे 6 ते 9 लिटर पाणी वापरले जाते. ज्यामुळे मल पूर्णपणे टॉयलेटमधून बाहेर पडते.   

3/7

फ्लश टॅंकला असलेले फ्लशचे लहान बटण हे टॉयलेटमध्ये लघवी केल्यावर वापरले जाऊ शकते. हे बटण एका वेळी सुमारे 3 ते 4 लिटर पाणी सोडते.   

4/7

फ्लश टॅंकला असलेल्या लहान बटणाचा उपयोग माहित नसल्याने बरेचजण मोठ्या बटणाचा वापर करतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वापरले जाते.   

5/7

ड्युअल फ्लश सिस्टमची कल्पना अमेरिकन इंडस्ट्रियल डिझायनर विक्टर पेपानेक यांची होती. 1976 मध्ये आलेल्या त्यांच्या 'डिझाइन फॉर द रिअल वर्ल्ड' या पुस्तकातही त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 

6/7

ड्युअल फ्लशची निर्मिती जगात प्रथमच ऑस्ट्रेलियामध्ये 1980 साली झाली. त्यानंतर इतर देशांमध्ये देखील ड्युअल फ्लश बसवण्याचा ट्रेंड वाढला.

7/7

ड्युअल फ्लशचा विचारपूर्वक वापर केल्यास एखादी व्यक्ती वर्षभरात 20,000 लिटर पाण्याची बचत करू शकते. ड्युअल फ्लश हे सिंगल फ्लशच्या तुलनेत महाग असले तरी पर्यावरणास अनुकूल असून यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते.