बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या अल्लू अर्जुनचे 'हे' आहेत 5 फ्लॉप चित्रपट

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा 2'मुळे प्रचंड चर्चेत आहे. पण आम्ही तुम्हाला सुपरस्टारच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. 

Soneshwar Patil | Dec 14, 2024, 13:09 PM IST

बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या अल्लू अर्जुनचे 'हे' आहेत 5 फ्लॉप चित्रपट | These are the 5 flop films of South superstar Allu Arjun

1/7

अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्याने त्याच्या करिअरची सुरुवात 2003 मध्ये गंगोत्री चित्रपटापासून केली. 

2/7

बालकलाकार

त्यापूर्वी 1985 मध्ये त्याने बालकलाकार म्हणून 'विजेता' चित्रपटात काम केलं आहे. त्याने 30 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

3/7

आर्या

अल्लू अर्जुनचा 'आर्या' चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये कॉलेजमधील गुंडगिरी आणि प्रेमाभोवती फिरते. हा चित्रपट प्रचंड फ्लॉप ठरला होता. 

4/7

आर्या 2

'आर्या 2' चित्रपटाची कथा पहिल्या भागाशी मिळतीजुळती आहे. हा चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये दोन बालपणीच्या मित्रांची कथा आहे. हा देखील फ्लॉप ठरला. 

5/7

Happy

'Happy'हा चित्रपट 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यात अभिनेत्याने पिझ्झा डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करु शकला नाही.   

6/7

वरूडू

2010 मध्ये अल्लू अर्जुनचा अॅक्शन-रोमँटिक चित्रपट 'वरूडू' प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना आवडला पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. 

7/7

वेदम

'वेदम' चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात 5 पात्रांची वेगळी कथा दाखवण्यात आलीये. कथेचं कौतुक देखील झाले. पण चित्रपट जास्त कमाई करू शकला नाही.