Gold Price Today: सोनं खरेदी करायला जाताय? पाहा आजचा सोन्याचा दर

Gold Price Today: सोन्याच्या भावामध्ये आज वाढ झाल्याचं दिसून येतंय. पाहा आजचा सोन्याचा दर किती आहे?

| Dec 15, 2023, 12:38 PM IST
1/7

एक वेळ 6 हजार रुपये प्रति 10 ग्राम असलेल्या सोनं आता महाग झालं आहे. इतकंच नाही तर सोन्याचा भाव येणाऱ्या काळात वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय.

2/7

गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली होती. सोन्याच्या दरात तब्बल तीन हजार रुपयांची घट झालेली पहायला मिळाली होती.

3/7

MCX एक्सचेंजवर आज म्हणजेच शुक्रवारी सकाळी, 5 फेब्रुवारी 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव हा 62,479 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता.

4/7

गुरुवारी संध्याकाळी हा भाव 62,454 रुपयांवर बंद झाला. तर 5 एप्रिल 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 62,955 रुपयांवर होता.

5/7

जागतिक स्तरावर देखील सोन्याच्या भावामध्ये उसळी दिसून आलीये. कॉमेक्सवर सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत 0.31 टक्के किंवा $6.30 च्या वाढीसह $2051.20 प्रति औंसवर व्यवहार ट्रेड होतोय. 

6/7

सोन्यासोबत चांदीच्या भावांमध्येही वाढ झाल्याचं दिसून येतंय. कॉमेक्सवर, चांदीचा वायदा भाव 0.10 टक्के किंवा $0.02 च्या वाढीसह $ 24.41 प्रति औंसवर ट्रेड होतोय.

7/7

चांदीची जागतिक स्तरावर किंमत 24.12 डॉलर प्रति औंसवर ट्रेड होतेय.