27 कोटी नाही Tax Cut करुन पंतला मिळणार एवढीशीच रक्कम; ही आकडेमोड पाहून व्हाल थक्क

How Much Will Rishabh Pant Earn After Taxes From Rs 27 Crore: ऋषभ पंतवर विक्रमी बोली लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला तो खरा ठरला. पंतसाठी तब्बल 27 कोटींची किंमत मोजण्यात आले आहेत. मात्र हे सगळे 27 कोटी पंतला मिळणार नाही असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरं आहे. पंतला इन हॅण्ड किती पैसे मिळतील पाहूयात...

| Nov 27, 2024, 10:38 AM IST
1/13

pantipl2025lsg

पंतला बसणार टॅक्सचा मोठा फटका? हाती किती पैसे पडणार पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जाणून घ्या पंतला 27 कोटींपैकी इन हॅण्ड सॅलरी नेमकी किती मिळणार...

2/13

pantipl2025lsg

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने इंडियन प्रिमिअरच्या लिलावामध्ये एक अनोखा पराक्रम केला आहे. सर्वाधिक बोली मिळवणारा खेळाडू म्हणून पंतच्या नावाची नोंद आयपीएलच्या इतिहासात झाली आहे. पंतने आता दिल्ली सोडून लखनऊनच्या संघाचा हात धरला आहे.

3/13

pantipl2025lsg

लखनऊ सुपर जायंट्सच्या संघांने पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले आहेत. रविवारी पंतसाठी गोयंकांच्या मालकीच्या लखनऊच्या संघाने लावलेली बोली ही आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली ठरली आहे. 

4/13

pantipl2025lsg

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने राईट टू मॅच वापरुन पंतला पुन्हा संघात घेण्यासाठी 20.75 कोटींची बोली लागल्यानंतर एक प्रयत्न करुन पाहिला.

5/13

pantipl2025lsg

मात्र लखनऊच्या संघाने पंतसाठी 27 कोटी मोजण्याची तयारी दर्शवली. ही रक्कम बघून दिल्लीने माघार घेतल्याने पंत लखनऊच्या संघाचा भाग झाला.

6/13

pantipl2025lsg

2022 साली डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये झालेल्या जीवघेण्या अपघातातून पंत थोडक्यात बचावला आणि त्याने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कमबॅक केलं. आता तो लखनऊच्या संघासाठी 14 मार्च 2025 पासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळणार आहे. 

7/13

pantipl2025lsg

मात्र पंतवर 27 कोटींची बोली लागली असली तरी या रक्कमेवर त्याला कर भरावा लागणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? कर दिल्यानंतर त्याच्याकडे किती पैसे शिल्लक राहतील माहितीये का? तसेच त्याच्या कॉन्ट्रॅक्टमधील काही अटी त्याला मिळणारी रक्कम कमी करु शकतात. नेमके किती पैसे पंतच्या हाती येतील पाहूयात...  

8/13

pantipl2025lsg

आयपीएलच्या स्पर्धेदरम्यान पंत जखमी झाला आणि तो उर्वरित स्पर्धा खेळू शकला नाही तरी त्याला संघ पूर्ण पैसे देणार असं कंत्राटामध्ये नमूद आहे. मात्र तो स्पर्धेआधीच जखमी झाला आणि खेळूच शकला नाही तर त्याच्या जागी इतर खेळाडूला निवडण्याचा अधिकार संघाकडे असणार आहे. या परिस्थितीत संघ पंतला एक रुपायही देणं लागणार नाही.

9/13

pantipl2025lsg

परदेशी खेळाडूंसाठी नियम वेगळे आहेत. पंत जर परदेशी असता आणि तो स्पर्धेदरम्यान जखमी झाला आणि बाहेर पडला तरी त्याला पूर्ण पैसे मिळाले नसते. कारण परदेशी खेळाडूंना मानधन देण्याच्या अटी अधिक कठोर आहेत.

10/13

pantipl2025lsg

आयपीएलदरम्यान पंत किंवा कोणत्याही परदेशी अथवा भारतीय खेळाडूने एखादा सामना नाही खेळला तर संघ त्याला मानधन नाकारु शकत नाही. संघाला संपूर्ण पर्वासाठी ठरलेलं मानधन खेळाडूंना देणं बंधनकारक असणार आहे. 

11/13

pantipl2025lsg

आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव होतो आणि त्यानुसार त्यांचे संघांबरोबर करार होतात. एकंदरित कंत्राटासाठी संघ किती पैसे देणार याची रक्कम लिलावामध्ये सांगितली जाते. आता उदाहरण घ्यायचं झालं तर आपण पंतचे उदाहरणच घेऊयात.

12/13

pantipl2025lsg

पंतला आता लखनऊचा संघ दर पर्वासाठी 27 कोटी रुपये देणार आहे. म्हणजेच तीन पर्वांसाठी पंतला 81 कोटी रुपये मिळणार आहेत. 

13/13

pantipl2025lsg

मात्र पंतला दर पर्वाला मिळणाऱ्या रक्कमेमधून भारत सरकार कर म्हणून 8 कोटी 10 लाख रुपये कापून घेणार. म्हणजेच पंतला 27 कोटींची बोली लागल्यानंतरही केवळ 18 कोटी 90 लाख रुपयेच हातात पडणार आहेत.