सर्वात स्वस्त ऑनलाइन रेल्वे तिकीट 'येथे' मिळतं, याबद्दल तुम्हाला कोणीच सांगणार नाही!

आता तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून कोणत्याही ट्रेनमध्ये कधीही, कुठेही तुमची सीट आरक्षित करू शकता.ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी अनेक ॲप उपलब्ध आहेत.

Pravin Dabholkar | Nov 26, 2024, 21:54 PM IST

Online Train Ticket Booking:आता तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून कोणत्याही ट्रेनमध्ये कधीही, कुठेही तुमची सीट आरक्षित करू शकता.ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी अनेक ॲप उपलब्ध आहेत.

1/9

सर्वात स्वस्त ऑनलाइन रेल्वे तिकीट 'येथे' मिळतं, याबद्दल तुम्हाला कोणीच सांगणार नाही!

Indian Railway Online Train Ticket Booking IRCTC Platform Marathi News

Online Train Ticket Booking: भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतीय रेल्वे ही आपल्या देशाची जीवनवाहिनी आहे यात शंका नाही. भारतीय रेल्वेमध्ये दररोज करोडो लोक प्रवास करतात आणि त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतात.

2/9

रेल्वे काउंटरवर तासनतास उभे

Indian Railway Online Train Ticket Booking IRCTC Platform Marathi News

एक काळ असा होता की आपण रेल्वे काउंटरवर तासनतास उभे राहायचो. ट्रेनमध्ये जागा आरक्षित करण्यासाठी आपली पाळी येण्याची वाट पहायचो. पण डिजिटल होत असलेल्या भारतात तिकीट बुक करणे आता खूप सोपे झाले आहे.

3/9

तुमची सीट आरक्षित करू शकता

Indian Railway Online Train Ticket Booking IRCTC Platform Marathi News

आता तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून कोणत्याही ट्रेनमध्ये कधीही, कुठेही तुमची सीट आरक्षित करू शकता.ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी अनेक ॲप उपलब्ध आहेत

4/9

खासगी कंपन्यांच्या ॲपवर

Indian Railway Online Train Ticket Booking IRCTC Platform Marathi News

आज भारतात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या मोबाइल ॲप्सवर ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा देतात. या खासगी कंपन्यांच्या ॲपवर करोडो प्रवासी तिकीट बुक करतात.

5/9

विविध शुल्कांमुळे तिकिटाची किंमत वाढते

Indian Railway Online Train Ticket Booking IRCTC Platform Marathi News

या कंपन्या प्रत्येक तिकिटावर विविध प्रकारचे शुल्क आकारतात. या विविध शुल्कांमुळे तिकिटाची एकूण किंमत खूप जास्त होते. आज आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तिकीट बुक करून खूप पैसे वाचवू शकता.

6/9

सर्वात स्वस्त रेल्वे तिकीट कुठे मिळेल?

Indian Railway Online Train Ticket Booking IRCTC Platform Marathi News

भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या IRCTC च्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपद्वारे स्वस्त दरात तिकीट ऑनलाइन बुक केले जाऊ शकते.

7/9

शुल्क भरण्याची आवश्यकता नसते

Indian Railway Online Train Ticket Booking IRCTC Platform Marathi News

IRCTC वरून ऑनलाइन तिकीट बुक करून, तुम्हाला सुविधा शुल्क, एजंट सेवा शुल्क आणि पेमेंट गेटवे शुल्क भरण्याची आवश्यकता नसते.

8/9

जास्त पैसे

Indian Railway Online Train Ticket Booking IRCTC Platform Marathi News

जेव्हा तुम्ही खाजगी कंपन्यांच्या ॲप्सद्वारे तिकीट बुक करता तेव्हा तुम्हाला सुविधा शुल्क, एजंट सेवा शुल्क आणि पेमेंट गेटवे शुल्क या स्वरूपात जास्त पैसे द्यावे लागतात.

9/9

खूप पैसे वाचवू शकता

Indian Railway Online Train Ticket Booking IRCTC Platform Marathi News

IRCTC द्वारे तिकीट बुक करून तुम्ही खूप पैसे वाचवू शकता. आजही खासगी कंपन्यांच्या ॲपद्वारे तिकीट बुक करणारे आणि इच्छा नसतानाही जास्त पैसे भरणारे अनेक जण आहेत. IRCTC द्वारे तुम्ही थेट दिल्ली ते वाराणसीच्या थर्ड एसी तिकिटावर 100 रुपयांपेक्षा जास्त बचत करू शकता. ही बचत प्रवासाचे अंतर आणि वेगवेगळ्या वर्गानुसार कमी-अधिक असू शकते.