जगातील सर्वात मोठं मनोरूग्णालय आता बनलंय भयानक खंडर! पहा फोटो
जर तुम्हाला हॉरर ठिकाणं पाहण्याची आवड असेल तर आम्ही तुम्हाला एक उत्तम ठिकाण सांगणार आहोत. हे ठिकाण जगातील सर्वात मोठं मनोरूग्णालय आहे. अमेरिकेतील जॉर्जियामध्ये असलेलं सेंट्रल स्टेट हॉस्पिटल हे जगातील सर्वात मोठे मनोरुग्णालय मानलं जातं. ते सामान्य पर्यटकांसाठी खुलं करण्यात आले आहे. एकेकाळी या ठिकाणी हजारो मानसिक लोकांवर उपचार होत होते. पण आता हे एक झपाटलेलं ठिकाण मानलं जातं आणि लोक इथे जायला घाबरतात.
1/4
डेली मेल मधील बातमीनुसार, हे हॉस्पिटल 1842 मध्ये बांधलं गेलं. 1960 पर्यंत हे जगातील सर्वात मोठं मनोरूग्णालय मानलं जायचं. एकाच वेळी 12 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. यानंतर हळूहळू लोकं कमी झाले आणि या रुग्णालयाच्या अनेक इमारती भयावह अवस्थेत बदलल्या. अजूनही काही लोकांवर या ठिकाणी उपचार केले जातात.
2/4
3/4
या ठिकाणी 25 हजारांहून अधिक रुग्णांना दफन करण्यात आलं आहे. त्या रुग्णांच्या नावांसह धातूपासून बनवलेल्या प्लेट्स याठिकाणी पुरल्या आहेत. नंतर या रुग्णालयाची अवस्था अत्यंत वाईट झाली. या हॉस्पिटलमध्ये भुतांचे वास्तव्य असल्याचं स्थानिक लोकं सांगतात. येथे रिक्त असलेले भाग हॉन्टेड असल्याच्या चर्चा आहेत, मात्र याची पुष्टी झाली नाही.
4/4