₹7500000/ Kg... खरंच तुमच्या कापलेल्या नखांना एवढा भाव मिळतो का?

तुम्ही कापलेल्या नखांची किंमत 75 लाख रुपये प्रति किलो? व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय? जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Oct 06, 2024, 14:41 PM IST
1/7

नखांची किंमत

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुमचे कापलेले नखे 75 लाख रुपये प्रति किलोने विकले जात असल्याचे सांगितले जात आहे. 

2/7

बाजारपेठ

या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, जपानमध्ये नखांची मोठी बाजारपेठ आहे. हे कापलेले नख तिथे विकत घेतले जातात

3/7

सौंदर्य उत्पादने

ही नखे खरेदी करून सौंदर्य उत्पादने तयार केली जातात असा दावा केला जात आहे. त्यामुळे या दाव्यात कितपत तथ्य आहे हे तुम्हाला माहिती आहे का? 

4/7

चौकशी

दरम्यान, जपानमधील या व्यवसायाची चौकशी केली असता असे समोर आले आहे की तिथे अशा बाजारपेठ नाहीत. 

5/7

तपासणी

तसेच, सोशल मीडियावर याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. अनेक वेळा तपासणी केल्यानंतर ही माहिती चुकीची असल्याचे म्हटलं जात आहे. 

6/7

दिशाभूल

अनेक जणांनी हा व्हिडीओ दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलं आहे. जपानमध्ये या व्यवसायाची तपासणी केली आहे. 

7/7

नखांचा व्यापार

जपानमध्ये कापलेल्या नखांचा कोणताही व्यापार होत नसल्याचेही तपासातून समोर आले आहे.